देहूरोड प्रतिनिधी : जुना मुंबई-पुणे महामार्गावर सेन्ट्रल चेकपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर भरधाव आणि निष्काळजीपणे आयशर टेम्पो चालवून स्विफ्ट डिझायर कारचे नुकसान केल्याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी गौरव सुनील शेळके (वय २३, व्यवसाय चालक, रा. बेवडओहळ, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव शेळके हे देहूरोडहून तळेगाव दाभाडेच्या दिशेने जात असताना त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारला (क्र. एमएच १४ एनई ८८८२) आयशर टेम्पो (क्र. एमएच ०४ केएफ ७०९३) चालक अरुण अंबादार नंजिरे (वय ३०, रा. महात्मा गांधी नगर, रखाळे पोलिस ठाण्यामागे, नवी मुंबई) याने भरधाव वेगाने व हयगयीने वाहन चालवून धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाले.
या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३२४(४), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास देहूरोड पोलिस करीत आहेत.