Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला कोथरूड पोलिसांनी रंगेहाथ पकडले; दोन पिस्टल, दोन काडतुसे जप्त
पुणे

पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला कोथरूड पोलिसांनी रंगेहाथ पकडले; दोन पिस्टल, दोन काडतुसे जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे : पिस्टल विक्रीसाठी केळेवाडी परिसरात आलेल्या २१ वर्षीय तरुणाला कोथरूड पोलिसांच्या तपास पथकाने रंगेहाथ पकडले. प्रेम देवेंद्र साळुंखे (वय २१, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. १९ ऑगस्ट रोजी पोलीस हवालदार शकील पठाण आणि पोलीस शिपाई शिवप्रसाद दहिफळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, केळेवाडी येथील कुमार प्रॉपर्टीजच्या मोकळ्या जागेत, पंपिंग स्टेशनपासून काही अंतरावर पांढरा शर्ट व निळी जीन्स परिधान केलेला एक तरुण कमरेला पिस्टल लावून थांबला आहे.

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक पंचांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून संशयिताकडे पिस्टल विक्रीसाठी आहे का, याची खात्री केली. त्याने पिस्टल विक्रीसाठी असल्याचे सांगताच गुप्त बातमीदाराने इशारा केला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पंचांसमक्ष झडती घेतली असता प्रेम साळुंखे याच्या कमरेला दोन पिस्टल आढळून आले. तसेच खिशाची तपासणी केली असता दोन जिवंत काडतुसे मिळून आली. ही शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे आरोपीने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३३८/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, प्रभारी पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ मिलिंद मोहिते, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील कारोटे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले यांच्यासह पोलीस हवालदार दत्तात्रय सोनावणे, राजेंद्र लांडगे, श्रीकांत दगडे, शकील पठाण तसेच पोलीस शिपाई शिवप्रसाद दहिफळे, मयुर पांढरे, वैभव शितकाल, गणेश डोंगरे, ऋषीकेश कोळप आणि आकाश वाल्मिकी सहभागी झाले.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशेतीच्या उत्पादकता वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली – खा. संजय राऊत 
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ चे दिमाखात उद्घाटन

September 7, 2026

दहीहंडीतील लावणीवरून राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा!

September 7, 2026

धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?