Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली – खा. संजय राऊत 
पिंपरी चिंचवड

विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली – खा. संजय राऊत 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 21, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

खा. संजय राऊत आणि माजी खा. विनायक राऊत यांच्या हस्ते “उद्धव श्री पुरस्कार” वितरण   

पिंपरी, पुणे (दि. २१ ऑगस्ट २०२६) ….कलाकारांना, क्रीडापटूंना, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राजाश्रय मिळाला पाहिजे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच अशा व्यक्तींचा सन्मान केला आहे. रक्तदान आणि आरोग्य शिबिरांची चळवळ बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्धव ठाकरे जबाबदारीने काम करीत आहेत. कोरोना काळात अवघे जग ठप्प झाले असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी घेतली होती. याची दखल सर्वोच्च न्यायालयाने देखील घेतली आहे. त्यांच्या नावे दिलेले पुरस्कार हा सन्मान आहे. जिथे संकट तिथे शिवसेना अशा पद्धतीने सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना काम करीत आहे. शिवसेनेने अगोदर काम केले आणि मग मतं मागितली. तर विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने “उद्धव श्री पुरस्कार २०२६” चे वितरण खासदार संजय राऊत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी खा. विनायक राऊत यांनी सांगितले की, सध्या राजकारणात पुढे पुढे करणाऱ्यांचे दिवस आहेत. प्रामाणिक माणसांच्या पदरी उपेक्षा पडत आहे, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून पुरस्कार देऊन सन्मान केला जात आहे. महाराष्ट्रातील ३६ हजार उद्योग बंद पडले आहेत हे महाराष्ट्राला लाजिरवाने आहे. उद्योजकांना दिलासा देण्या ऐवजी त्रास दिला जात आहे. महाराष्ट्रात त्यांच्यावर सर्वात जास्त टॅक्स लावला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या चेतन पवार यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा पूर्ण विश्वास आहे असे माजी खा. विनायक राऊत यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहर प्रमुख चेतन पवार यांनी स्वागत, प्रास्ताविक करताना सांगितले की, हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान आहे. यातील अनेकांनी कोरोना सारख्या जोखीम काळात देखील पुढे येऊन आपले कर्तव्य बजावले आहे.

डॉ. संतोष लाटकर (वैद्यकीय), डॉ. रोहन काटे (वैद्यकीय), प्रा. तुकाराम पाटील (साहित्यिक), काशिनाथ नखाते (कामगार), प्रीती वैद्य (सामाजिक), चांद पाशा अहमद हुसेन तांबोळी (क्रीडा) पै. योगेश्वर तापकीर (क्रीडा) भाग्यश्री मोरे (सामाजिक), रामदास काटे (कृषी) आणि डॉ. संजीव कुमार पाटील (कला), शौर्या भरणे (क्रीडा), रियाज शेख (कुस्ती) आणि भाग्यश्री मोरे (दिव्यांगांसाठी कार्य) यांचा “उद्धव श्री पुरस्कार २०२६” सन्मान करण्यात आला.

यावेळी वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड, पिंपळे निलख येथील युवक आणि युवतींनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे खा. संजय राऊत यांनी स्वागत केले.

यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार तसेच रोमी संधू, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख लतिकाताई पाष्टे, सुशीला पवार, विजय सुळे, गजानन थरकुडे, सुनील सावंत, ज्ञानेश्वर शिंदे, ज्योती भावे, सचिन मगर, नितीन घोलप आदीं उपस्थित होते.

फुटीर गट न्यायालयात युक्तिवाद करू शकत नाही ते फक्त त्यांचे म्हणणं मांडू शकतात – खा. संजय राऊत

शिवसेना पक्ष फुटीवर सध्या आमच्या पक्षाच्या युक्तिवाद न्यायालयात संपला आहे. फुटीर गट सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करू शकत नाही ते फक्त त्यांचं म्हणणं मांडू शकतात. ते सुरतला कसे गेले, गुवाहाटी आणि गोव्याला कसे गेले आणि किती, कुठे, कसं शेण खाल्लं हे फक्त ते न्यायालयासमोर मांडू शकतात ते युक्तिवाद करू शकत नाही अशी बोचरी टीका खा. संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिस्टल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला कोथरूड पोलिसांनी रंगेहाथ पकडले; दोन पिस्टल, दोन काडतुसे जप्त
Next Article ज्येष्ठ साहित्यिक व कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांचा महापालिका सभेत गौरवपूर्ण सत्कार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?