पुणे,हिंजवडी प्रतिनिधी: हिंजवडी परिसरात अमली पदार्थविरोधी कारवाई करत पोलिसांनी राजस्थानमधील एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून सुमारे १० हजार ४५० रुपये किमतीचा पॉप्पी स्ट्रॉ (अफूच्या झाडांच्या सुकलेल्या बोंडांचा चुरा) जप्त केला.
हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजि. क्र. ५४३/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), १५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर, वाकड-पुणे येथील हॉटेल मॅकडोनाल्डसमोर ही कारवाई करण्यात आली. आरोपी जगदीशकुमार हापुराम विष्णोई (वय ३८, रा. ग्राम विरावा, ता. चितेलवाना, जि. जालोर, राजस्थान) याच्या ताब्यात पॉप्पी स्ट्रॉ हा अमली पदार्थ आढळून आला.
गुन्हे शाखा, युनिट-२चे पोलीस शिपाई रवि प्रकाश पवार (ब.क्र. २६५९) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.अमली पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून परिसरात कारवाई तीव्र करण्यात आली आहे