Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांचे निर्देश
पुणे

चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांचे निर्देश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 18, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे, दि. १८ ऑगस्ट: चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अवजड वाहनांचे पार्किंग, अतिक्रमणे, वीजपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर कालबद्ध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधित विभागांना स्पष्ट जबाबदाऱ्या व वेळमर्यादा निश्चित करण्यात आल्या.

मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार चाकण औद्योगिक परिसरातील प्रश्नांच्या समन्वयासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, एमआयडीसी, एमएसआयडीसी, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, जिल्हा परिषद, महसूल आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.

३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्ती…

चाकण औद्योगिक परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कामात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार आहे.

रस्त्यावरील पार्किंगला ‘झिरो टॉलरन्स’….

रस्त्यावर होणाऱ्या अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याने शुक्रवारपासून रस्त्यावरील वाहन पार्किंगला पूर्णतः प्रतिबंध करण्यात येणार आहे. एमआयडीसी परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागांचा पार्किंगसाठी नियोजनबद्ध वापर केला जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीसह कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

वाहतूक व्यवस्थेसाठी १०० एमएसएफ जवान…

चाकण परिसरातील वाहतूक व्यवस्थेसाठी १०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) जवान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे जवान दोन पाळ्यांमध्ये वाहतूक नियंत्रणाचे काम करतील. तसेच रस्त्यावर वाहने बंद पडल्याने कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे.

महिनाभरात अतिक्रमणे हटविणार…

रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, चहाचे स्टॉल, गोदामे आणि अन्य अतिक्रमणांची यादी तयार करून संबंधितांना नोटिसा देण्यात येणार आहेत. २५ ऑगस्टपासून पुढील महिनाभरात अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. कोणत्याही राजकीय किंवा अन्य दबावामुळे अतिक्रमणांवरील कारवाईत सूट दिली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

एआयच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन…

चाकण परिसरातील सुमारे ५०० किलोमीटर रस्त्यांचे सर्वंकष नियोजन करण्यात येणार असून, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक वाहतूक सिम्युलेशनचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून त्याचे व्यवस्थापन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून करण्याचे नियोजन आहे.

पादचारी सुरक्षेला प्राधान्य….

रस्ते विकासकामांमध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, पदपथ आणि पादचारी क्रॉसिंगसारख्या सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत डिव्हायडर कट बंद करून आवश्यक ठिकाणीच प्रवेश आणि यू-टर्नची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.

औद्योगिक परिसरातील वारंवार होणारे वीज ट्रिपिंग व लोडशेडिंग कमी करण्यासाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत यंत्रणा उभारण्याचे काम ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे ३१ डिसेंबरनंतर ही समस्या दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विकासकामांपूर्वी वाहतूक आराखडा बंधनकारक…

राष्ट्रीय महामार्ग, एमएसआयडीसी, रेल्वे आदी विभागांची आगामी कामे सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्ग, वाहतूक वळविण्याची व्यवस्था आणि वाहतूक सिम्युलेशनचा अभ्यास करणे आवश्यक राहणार आहे. नाशिक फाटा ते पुढील भागासाठी प्रस्तावित सुमारे २८ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले असून, सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यावर भर असल्याचे सांगितले.

चाकण औद्योगिक परिसरातील प्रश्नांच्या निराकरणासाठी निश्चित केलेल्या कालमर्यादेनुसार पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला. माध्यमांनीही उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून वस्तुनिष्ठ अभिप्राय द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये जनआक्रोश; हजारो समाजबांधवांचा महामोर्चा
Next Article पर्यावरण विभागातील सह शहर अभियंता व कार्यकारी अभियंता पदांचा अतिरिक्त पदभार सोपविला
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ चे दिमाखात उद्घाटन

September 7, 2026

दहीहंडीतील लावणीवरून राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा!

September 7, 2026

धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?