Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»केअर फॉर यू फाउंडेशनच्या ४३ विद्यार्थ्यांची इस्रो सफर
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

केअर फॉर यू फाउंडेशनच्या ४३ विद्यार्थ्यांची इस्रो सफर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अंतराळ विज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती; इस्रो अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्याशी ऑनलाइन संवाद

श्रीहरीकोटा, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विविध बालसंगोपन संस्थांमधील ४३ विद्यार्थ्यांना ‘केअर फॉर यू’ फाउंडेशनच्या पुढाकारातून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरीकोटा येथील केंद्राला शैक्षणिक भेट घडवून आणण्यात आली. १० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या भेटीत ३० स्वयंसेवकांचाही सहभाग होता. या शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना भारताच्या अंतराळ मोहिमा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रक्षेपण प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अनोखी संधी मिळाली.

या पथकासोबत फाउंडेशनचे मुख्य सल्लागार तथा महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व विशेष पथके) कृष्ण प्रकाश, IPS उपस्थित होते. फाउंडेशनच्या संस्थापक सीए पायल राठी, रोशन राठी, निपूर बजाज, प्रेम लोणारे, राकेश बजाज, निखिल बिहाणी, श्रेया भापकर, स्वरा वसानी, निवेदिता सुगंधी, अपूर्व आचार्य यांच्यासह सीए प्रसाद भंडारी, अॅड. कौवल्य कुलकर्णी, सिद्धार्थ गोंगडे, स्मिता सारडा आणि मधुसूदन सारडा आदी मान्यवर सहभागी झाले.

इस्रो अध्यक्षांशी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी संवाद

या भेटीतील विशेष आकर्षण म्हणजे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्याशी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन संवाद. बंगळूर येथून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली आणि अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले. व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन विद्यार्थ्यांशी झालेला हा संवाद त्यांच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी ठरला.

प्रक्षेपण केंद्र आणि नियंत्रण कक्षाची पाहणी

विद्यार्थ्यांनी श्रीहरीकोटा येथील पहिले व दुसरे प्रक्षेपण केंद्र तसेच नियंत्रण कक्षाची पाहणी केली. भारताच्या महत्त्वपूर्ण अंतराळ मोहिमा ज्या ठिकाणाहून पार पडतात, त्या अत्याधुनिक सुविधांची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. अंतराळ मोहिमेमागील शिस्त, अचूकता, तांत्रिक कौशल्य आणि समर्पणाचे महत्त्व यावेळी त्यांना समजावून सांगण्यात आले.

शास्त्रज्ञांकडून अंतराळ विज्ञानाचे धडे

इस्रोचे अधिकारी एन. कुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अंतराळ विज्ञानातील विविध संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. संचालक श्री. शुक्ला यांच्यासह इतर शास्त्रज्ञांनीही विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक बाबींची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना इस्रोतील अधिकारी व शास्त्रज्ञांचा सत्कार करण्याची संधीही मिळाली.

विद्यार्थ्यांनी दिली हस्ताक्षरातील आभारपत्रे

या अविस्मरणीय भेटीबद्दल विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांना स्वतःच्या हस्ताक्षरातील आभारपत्रे आणि ‘Thank You Letters’ प्रदान केली. इस्रोला दिलेली भेट ही केवळ शैक्षणिक सहल नसून मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची प्रेरणा देणारा अनुभव ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

इस्रोतर्फे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक, निवास आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण दौऱ्याचा आनंद घेत अंतराळ संशोधनाची जवळून ओळख करून घेता आली.

या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली असून, ज्ञान, शिस्त, मेहनत आणि समर्पणाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला.

या शैक्षणिक भेटीस परवानगी दिल्याबद्दल ‘केअर फॉर यू’ फाउंडेशनच्या वतीने महिला व बाल विकास विभागाचे आभार मानण्यात आले. तसेच इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन, सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी आणि या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Post Views: 21
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआयसीएआय पिंपरी-चिंचवड शाखेत उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा
Next Article मोशी कचरा डेपो दुर्घटनेवर राजकारण नको; आत्मचिंतन करा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महाराष्ट्र ३३,८७२ स्टार्टअप्ससह देशात अव्वल, मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास -केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

September 7, 2026

छत्रपती शिवरायांच्या विचारांवरनवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र

August 31, 2026

दिल्लीतील मऱ्हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्ती विक्री पुरणपोळीही उपलब्ध

August 27, 2026

रेड झोनमुक्तीपासून महामार्ग, क्रीडा क्रांती ते महिला उद्योग क्लस्टरपर्यंत विकासाचा व्यापक अजेंडा… रवी लांडगे

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?