Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटनेवर राजकारण नको; आत्मचिंतन करा
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटनेवर राजकारण नको; आत्मचिंतन करा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भाजपा मुख्य प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे यांचा आमदार रोहित पवारांना इशारा; ‘पिंपरी-चिंचवड हे राजकीय प्रयोगांचे मैदान नव्हे!’

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी..मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. या घटनेचे राजकीय भांडवल करण्याऐवजी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, दुर्घटनेची निष्पक्ष व वस्तुनिष्ठ चौकशी करणे तसेच भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा मुख्य प्रवक्ते तथा माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांनी मांडली.

दुर्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोशी दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून मृतांच्या कुटुंबीयांचे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. महापालिकेने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासोबतच दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

‘पुराव्यांशिवाय आरोप सहन करणार नाही’

दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी करणे हा लोकशाहीतील प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, कोणतेही ठोस पुरावे किंवा अधिकृत कागदपत्रे नसताना भाजपचे स्थानिक नेतृत्व आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर वारंवार आरोप करणे योग्य नाही. अशा प्रकारचे आरोप आम्ही सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा दुर्गे यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना दुर्गे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये वारंवार येऊन स्थानिक लोकप्रतिनिधींवर आरोप करण्याऐवजी ठोस पुरावे आणि अधिकृत कागदपत्रांसह भूमिका मांडावी. केवळ राजकीय वक्तव्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तथ्यांच्या आधारे योग्य प्रत्युत्तर दिले जाईल.

‘पिंपरी-चिंचवड हे कोणाच्याही राजकीय प्रयोगाचे मैदान नाही’

पिंपरी-चिंचवड हे कोणत्याही एका व्यक्तीच्या राजकीय प्रयोगाचे मैदान नाही. शहरातील प्रश्नांवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार जनतेचा आहे. नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता दिली असून, जनतेने दिलेल्या जनादेशाचा सर्वांनी आदर करावा, असेही दुर्गे यांनी नमूद केले.

आज पिंपरी-चिंचवडसमोर कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उभा आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या विषयावर राजकीय श्रेयवाद करण्यापेक्षा विधायक चर्चा आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे. प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण यंत्रणा अधिक सुरक्षित, आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मृतांना खरी श्रद्धांजली म्हणजे कायमस्वरूपी उपाययोजना’

मोशी दुर्घटनेतील मृतांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे होय.

“राजकारण करायचे असेल तर विकासाच्या मुद्यांवर करा; मात्र मृतांच्या दुःखावर राजकारण करू नका. शहराच्या स्थापनेपासून कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचे सर्वांनी आत्मचिंतन करावे,” 

……राजाभाऊ दुर्गे, प्रवक्ते.पिं.चिं.शहर भाजपा.

Post Views: 27
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकेअर फॉर यू फाउंडेशनच्या ४३ विद्यार्थ्यांची इस्रो सफर
Next Article हरवलेली बॅग शोधून कुटुंबाला परत; पोलीस अधिकाऱ्याच्या तत्परतेला सलाम!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?