Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»हरवलेली बॅग शोधून कुटुंबाला परत; पोलीस अधिकाऱ्याच्या तत्परतेला सलाम!
पुणे

हरवलेली बॅग शोधून कुटुंबाला परत; पोलीस अधिकाऱ्याच्या तत्परतेला सलाम!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

हडपसरमध्ये एएसआय जनार्धन भागवत यांचा माणुसकीचा आदर्श; मोबाईल, महत्त्वाची कागदपत्रे व रोख रकमेसह बॅग केली सुखरूप परत

पुणे, प्रतिनिधी,दिं.१७ ऑगस्ट : कर्तव्य बजावत असताना नागरिकांच्या अडचणीच्या प्रसंगी धावून जात त्यांना मदत करणे, हीच खरी पोलीस सेवाभावाची ओळख आहे. याचा प्रत्यय हडपसर येथे दि. १६ ऑगस्ट रोजी आला. घरफोडीच्या कॉलवर जात असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्धन गणपत भागवत यांनी हरवलेली बॅग शोधून ती संबंधित कुटुंबाला सुखरूप परत केली.

दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता एएसआय जनार्धन भागवत हे चंदननगर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या कॉलवर कर्तव्य बजावण्यासाठी जात असताना हडपसर वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ थांबले होते. यावेळी श्री. श्रीकांत मेटकरी, त्यांच्या पत्नी सौ. माधुरी मेटकरी आणि त्यांच्या दोन लहान मुली घाबरलेल्या अवस्थेत बॅग शोधण्यासाठी धावपळ करताना त्यांना दिसले.

मेटकरी कुटुंबीयांनी सांगितले की, ते सुरक्षा नगर, हडपसर येथून आंबेजोगाई (बीड) येथे जाण्यासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, घाईगडबडीत त्यांची एक बॅग रिक्षामध्येच राहून गेली होती. या बॅगेमध्ये मोबाईल फोन, महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम असल्याने कुटुंबीय चिंतेत होते.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एएसआय भागवत यांनी तातडीने बॅग शोधण्याची कार्यवाही सुरू केली. बॅगेतील मोबाईल क्रमांकावर वारंवार संपर्क साधल्यानंतर अखेर रिक्षाचालकाने फोन उचलला. त्याच्याशी संपर्क साधून बॅग परत आणण्याची विनंती करण्यात आली.

पोलीस अधिकाऱ्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत रिक्षाचालक अवघ्या १५ मिनिटांत बॅग घेऊन हडपसर येथे आला. बॅगेतील सर्व साहित्य तपासून ते जसेच्या तसे मेटकरी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन म्हणून १०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

या प्रसंगातून पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, तत्परता आणि माणुसकीचा प्रत्यय आला आहे. ‘पोलीस हा केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारा अधिकारी नसून, संकटाच्या काळात नागरिकांचा आधार असतो,’ हे एएसआय जनार्धन भागवत यांच्या कृतीतून अधोरेखित झाले.

मेटकरी कुटुंबीयांनी बॅग सुरक्षितपणे परत मिळाल्याबद्दल एएसआय भागवत तसेच प्रामाणिकपणे बॅग परत करणाऱ्या रिक्षाचालकाचे मनःपूर्वक आभार मानले.

पोलीस अधिकारी आणि जनतेचा सेवक म्हणून कर्तव्य बजावताना दाखविलेल्या या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

‘पोलीस सेवेत कर्तव्याबरोबर माणुसकीही महत्त्वाची!’ — एएसआय जनार्धन भागवत यांच्या कृतीतून संदेश

Post Views: 35
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी कचरा डेपो दुर्घटनेवर राजकारण नको; आत्मचिंतन करा
Next Article बोपदेव घाटातील हॉटेलमध्ये कथित हुक्का पार्टी अन् DJचा दणदणाट?
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ चे दिमाखात उद्घाटन

September 7, 2026

दहीहंडीतील लावणीवरून राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा!

September 7, 2026

धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?