पिंपरी (प्रतिनिधी) : निगडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI), पिंपरी-चिंचवड शाखेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमास जीएसटीचे सहाय्यक आयुक्त मुकुंद सोबळे, IACC चे संस्थापक राजेंद्र व्ही. गांगर्डे, ICAI पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए महावीर कोठारी, उपाध्यक्ष मनोज मालपाणी, सचिव सीए सारिका चोरडिया, खजिनदार तथा सीए विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए धीरज बलदोटा, समिती सदस्य सीए शैलेश बोरे, सीए सचिन ढेरंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त मुकुंद सोबळे यांनी उपस्थित सनदी लेखापालांना मार्गदर्शन केले. देशाच्या आर्थिक विकासात सनदी लेखापालांची भूमिका, करप्रणाली तसेच व्यवसायातील बदलत्या आव्हानांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करत देशाच्या प्रगतीत व्यावसायिकांनी आपले योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.