अभिनेत्री पूजा चोप्रा यांच्या हस्ते उद्घाटन; पहिल्या व्हीएलएफ मॉबस्टर १३५ ची चावी स्वीकारली
पुणे, दि. १४ ऑगस्ट २०२६ : युरोपियन मोबिलिटी ब्रँड्सना भारतीय बाजारपेठेत विस्तार देणाऱ्या मोटोहाऊस इंडियाने पुण्यातील बाणेर येथे ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्सचे अत्याधुनिक फ्लॅगशिप शोरूम सुरू केले आहे. VALIDUS MOTOचे डीलर प्रिन्सिपल श्री. शैलेंद्र विश्वकर्मा यांच्या भागीदारीत हे शोरूम सुरू करण्यात आले.
ऑस्ट्रियामध्ये इंजिनिअर केलेल्या ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटलीतील बोलोग्ना येथे डिझाइन केलेल्या व्हीएलएफ स्कूटर्स आता पुण्यातील ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी मोटोहाऊस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके, डीलर प्रिन्सिपल शैलेंद्र विश्वकर्मा आणि अभिनेत्री व मिस इंडिया वर्ल्ड २००९ पूजा चोप्रा यांच्या हस्ते रिबन कापून उद्घाटन करण्यात आले.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पुण्यातील पहिल्या व्हीएलएफ मॉबस्टर १३५ स्कूटरची चावी अभिनेत्री पूजा चोप्रा यांना प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला प्रिंट, टीव्ही व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी, ऑटोमोबाईल पत्रकार, स्थानिक कंटेंट क्रिएटर्स तसेच ब्रँडशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.
पुण्याच्या प्रीमियम दुचाकी बाजारपेठेवर लक्ष
पुणे हे महाराष्ट्रातील प्रमुख ऑटोमोबाईल केंद्र असून शहरात दुचाकीप्रेमी, डिजिटल क्रिएटर्स आणि आधुनिक जीवनशैलीला पसंती देणाऱ्या ग्राहकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे प्रीमियम आणि वेगळ्या डिझाइनच्या युरोपियन दुचाकींसाठी पुणे ही महत्त्वाची बाजारपेठ असल्याचे मोटोहाऊस इंडियाने स्पष्ट केले.
बाणेर येथील नव्या शोरूममध्ये ब्रिक्स्टन क्रॉसफायर ५००एक्स, क्रॉसफायर ५००एक्ससी, क्रॉमवेल १२०० आणि क्रॉमवेल १२००एक्स या मोटरसायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर इटालियन डिझाइनच्या व्हीएलएफ मॉबस्टर १३५ पेट्रोल स्कूटरसह व्हीएलएफ टेनिस १५०० ही प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरही ग्राहकांना पाहता येणार आहे.
२०२६ अखेरपर्यंत आणखी १५ आउटलेट्स
मोटोहाऊस इंडियाने देशातील विस्ताराला गती देत २०२६ अखेरपर्यंत प्रमुख शहरांमध्ये आणखी १५ आउटलेट्स सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रीमियम युरोपियन मोटरसायकल्स, हाय-परफॉर्मन्स पेट्रोल स्कूटर्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन्स आणि रायडर कम्युनिटीचा अनुभव ग्राहकांना उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर आहे.
मोटोहाऊस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके म्हणाले, “पश्चिम भारतातील उपस्थिती मजबूत करण्यासाठी पुणे ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. पुण्यातील ग्राहकांसाठी ऑस्ट्रियन इंजिनिअरिंग आणि इटालियन डिझाइनचा संगम असलेली प्रीमियम वाहने आणताना आम्हाला आनंद होत आहे. उत्कृष्ट वाहनांसोबतच उत्साही रायडर कम्युनिटी आणि संस्मरणीय मालकीचा अनुभव निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
डीलर प्रिन्सिपल शैलेंद्र विश्वकर्मा म्हणाले, “ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्ससारखे जागतिक दर्जाचे युरोपियन ब्रँड पुण्यात आणताना अभिमान वाटत आहे. बाणेर येथील फ्लॅगशिप एक्सपिरियन्स सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांना विक्रीसोबतच उत्तम आफ्टर-सेल्स सेवा आणि रायडर कम्युनिटीशी जोडण्याचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
आधुनिक मोबिलिटीचा नवा पर्याय
पुण्यातील वाढत्या प्रीमियम दुचाकी बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर मोटोहाऊस इंडियाचे हे नवे फ्लॅगशिप शोरूम महत्त्वाचे मानले जात आहे. युरोपियन डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान, दमदार कामगिरी आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीचा पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने पुण्यातील दुचाकीप्रेमींसाठी हा नवा पर्याय ठरणार आहे.
