Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

November 25, 2026

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रेड झोन निर्बंध हटविणे, कचरा प्रक्रिया प्रकल्प व अग्निशमन केंद्रासाठी जागा उपलब्ध करण्याबाबत संरक्षण विभागासोबत सकारात्मक चर्चा

पिंपरी-चिंचवड, दि. १४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण विभागाशी संबंधित वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची भेट घेऊन शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. या भेटीची सकारात्मक दखल घेत संरक्षण मंत्री तसेच वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज खडकी हेडक्वार्टर्स येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस महापौर रवि लांडगे उपस्थित होते. त्यांनी कर्नल रवि कुमार गरगोत्रा यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

बैठकीत प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनची हद्द कमी करणे व शक्य त्या ठिकाणी निर्बंध हटविणे, शहरासाठी अत्यावश्यक असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी हॉटेल कलासागरजवळील संरक्षण विभागाची जागा उपलब्ध करून घेणे तसेच पिंपळे सौदागर परिसरात नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, या शहराच्या भविष्यातील विकासाशी थेट संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

विशेषतः रेड झोनचा प्रश्न हा हजारो नागरिकांच्या मालमत्ता, बांधकामे आणि परिसराच्या विकासाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मॅगझिन चौक येथील अम्युनेशन डेपो स्थलांतरित करण्यात आलेला असल्याने त्या परिसरावरील ‘रेड झोन’ निर्बंध पूर्णतः हटविण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने हॉटेल कलासागरजवळील संरक्षण विभागाची जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच पिंपळे सौदागर व लगतच्या परिसरातील आपत्कालीन सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या विषयावरही सकारात्मक चर्चा झाली.

केंद्र शासन, संरक्षण मंत्रालय, संरक्षण विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्यात प्रभावी समन्वय साधून हे प्रश्न निर्णायक टप्प्यापर्यंत नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले विषय केवळ चर्चेपुरते मर्यादित न ठेवता त्यावर ठोस निर्णय होऊन नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळावा, यासाठी सर्व स्तरांवर समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.

“पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनसह संरक्षण विभागाशी संबंधित अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या प्रश्नांचा थेट परिणाम हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच शहराच्या विकासावर होत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री मा. श्री. राजनाथ सिंह यांनी या विषयांची सकारात्मक दखल घेतल्यामुळे आज संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पुढील स्तरावर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः मॅगझिन चौक येथील अम्युनेशन डेपो स्थलांतरित झाल्याने त्या परिसरावरील रेड झोन निर्बंध पूर्णतः हटविण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून घेण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. शहरहिताचे हे प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न ठेवता ठोस निर्णयापर्यंत नेऊन नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळवून देणे, हेच आमचे ध्येय आहे.”

……. रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड 

बैठकीस नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, सहाय्यक संचालक संदेश खडतरे, खडकी हेडक्वार्टर्सचे जनसंपर्क अधिकारी किरण पवार तसेच संरक्षण विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post Views: 17
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोटोहाऊस इंडियाच्या विस्ताराला वेग; पुण्यात ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्सचे फ्लॅगशिप शोरूम
Next Article महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 20260

अनिल काची आणि अजय कांबळे यांच्या सतर्कतेमुळे बालिका सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात; पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे…

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?