Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत
पिंपरी चिंचवड

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वाढदिवसाचा जल्लोष टाळून कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून नऊ कुटुंबांना एकूण ९ लाखांची मदत

पिंपरी, दि. १४ ऑगस्ट २०२६ : मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत महापौर रवि लांडगे यांनी माणुसकीचा हात पुढे केला आहे. यंदाचा वाढदिवस कोणत्याही प्रकारे उत्साहात अथवा जल्लोषात साजरा न करण्याचा निर्णय घेत त्यांनी कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे एकूण ९ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.

मोशी येथील दुर्घटनेने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर हादरले असून अनेक कुटुंबांचे आधार हिरावले गेले आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यापेक्षा संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका महापौर रवि लांडगे यांनी घेतली.

कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्घटनेतील मृत भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान मृतांच्या नातेवाईकांकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका योगिता नागरगोजे तसेच राहुल लांडगे यांच्यासह संबंधित कुटुंबीय उपस्थित होते.

मोशी दुर्घटनेत आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलेल्या कुटुंबीयांचे दुःख कोणत्याही आर्थिक मदतीने भरून निघू शकत नाही. मात्र, संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मानसिक आणि आर्थिक आधार देणे ही समाज म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही मदत करण्यात आली असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

“दुःखात असलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे, हाच माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा अर्थ”

— महापौर रवि लांडगे

महापौर रवि लांडगे म्हणाले, “वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो; मात्र आपल्या शहरातील नऊ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना वाढदिवसाचा जल्लोष करणे मनाला पटणारे नाही. आपल्या माणसांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हाच माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा अर्थ आहे. आर्थिक मदतीने त्यांच्या प्रिय व्यक्तीची उणीव कधीही भरून निघणार नाही; मात्र ‘या कठीण काळात तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत’, हा विश्वास त्यांना देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.”

कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू, वंचित आणि संकटग्रस्त नागरिकांना यापुढेही शक्य ती मदत करण्याचे कार्य सुरू राहणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

वाढदिवसाचा आनंद काही क्षणांचा असतो; मात्र एखाद्या कुटुंबाच्या दुःखाच्या काळात दिलेला आधार आयुष्यभर स्मरणात राहतो. दुःखात सहभागी होणे, माणुसकी जपणे आणि संकटात असलेल्या आपल्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हाच यंदाच्या वाढदिवसाचा संकल्प असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले.

Post Views: 18
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल
Next Article चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?