Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 14, 2026

दापोडीत गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

August 14, 2026

निगडी पोलिसांची कारवाई; २१६ ग्रॅम गांजासह तरुण ताब्यात

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»तिरंगा रॅलीतून पिंपरी-चिंचवड दुमदुमणार
पिंपरी चिंचवड

तिरंगा रॅलीतून पिंपरी-चिंचवड दुमदुमणार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

पिंपरी, दि. १४ ऑगस्ट २०२६ (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर, राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, १५ ऑगस्ट रोजी संत तुकाराम नगर येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत शहरातील हजारो देशप्रेमी नागरिक, कामगार, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी व्हावेत, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले.

रॅलीची सुरुवात दुपारी ३ वाजता संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून होणार आहे. गंगानगर, महेशनगर, ॲटलॉस कॉलनी, डी.वाय. पाटील हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल या मार्गाने रॅलीचा प्रवास होणार असून, आचार्य अत्रे रंगमंदिर मार्गे पुन्हा रॅली सभास्थळी दाखल होईल. सुमारे तीन किलोमीटरचा हा तिरंगा प्रवास असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत रॅलीची सांगता होऊन त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीसाठी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरशेठ जगताप, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद सदस्य उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, महापौर रविजी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेकजी बारणे, गटनेते प्रशांतजी शितोळे यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो भारताच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. हा तिरंगा अभिमानाने फडकत राहावा यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आणि हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आणि राष्ट्राप्रती आपले कर्तव्य बजावणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.”

“राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयावर गेल्या ३० वर्षांपासून १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले जाते. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचा संदेश अधिक व्यापकपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पिंपरी-चिंचवड ही कामगारांची नगरी आहे. त्यामुळे या कामगारनगरीचे नागरिक तिरंग्याच्या सन्मानासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या रॅलीत एक हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा असून, रॅलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनालाही माहिती देण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा दिवस केवळ मनोरंजनासाठी न घालवता देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या तिरंग्याला अभिवादन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन भोसले यांनी केले.

“ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्या हुतात्म्यांचे स्मरण करूया; तिरंग्याला अभिवादन करून राष्ट्रभक्तीचा जागर करूया. पिंपरी-चिंचवडच्या कामगारनगरीतून देशप्रेमाचा बुलंद संदेश देण्यासाठी शेकडो कामगार, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिकांनी या तिरंगा रॅलीत सहभागी व्हावे,”

…….. यशवंतभाऊ भोसले, कामगार नेते 

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर
Next Article समाजहिताच्या उपक्रमांतून गणेश मंडळांचा आदर्शवत सहभाग : उप महापौर शर्मिला बाबर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

कुरुळीत महिलेचा गळा आवळून खून; जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

August 14, 2026

पिंपरी गावातील क्रीडांगणाची दुरवस्था; १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर साफसफाईची मागणी

August 14, 2026

समाजहिताच्या उपक्रमांतून गणेश मंडळांचा आदर्शवत सहभाग : उप महापौर शर्मिला बाबर

August 14, 2026

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 20260

पुणे,मोशी प्रतिनिधी …..एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात विवाहित महिलेला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार…

दापोडीत गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

August 14, 2026

निगडी पोलिसांची कारवाई; २१६ ग्रॅम गांजासह तरुण ताब्यात

August 14, 2026

ताथवडे येथे राँग साईडने आलेल्या स्कूल कॅनची स्कुटरला धडक; एक जखमी

August 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?