पुणे,बावधन | प्रतिनिधी…..पिरंगुट घाट येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २९ जुलै रोजी रात्री घडली. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता जखमीला रुग्णालयात दाखल न करता पळ काढल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष शर्मा (वय ४०) हे २९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास पिरंगुटच्या दिशेने जात होते. पिरंगुट घाट परिसरात पुण्याकडून आलेल्या अज्ञात वाहनाच्या चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालविले. त्याने शर्मा यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात शर्मा गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर संबंधित चालकाने अपघाताची माहिती न देता तसेच जखमीला रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी बावधन पोलीस पुढील तपास करीत आहेत.