भोसरी | प्रतिनिधी…..भोसरी येथील छावा चौक परिसरात पार्क केलेली सुमारे ४० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण ज्ञानेश्वर वैरागर (वय ४८, रा. बुद्धविहार शेजारी, भीमनगर, उत्तर लक्ष्मीनगर, मोशी, पुणे) यांनी त्यांची होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (एमएच १४ एमई ९५१७) ही दि. २४ जुलै २०२६ रोजी दुपारी २.३० ते ३.१५ वाजण्याच्या दरम्यान छावा चौक, फुगे प्राईस समोर, भोसरी ब्रीजखाली, भोसरी येथील सार्वजनिक रस्त्यावर लॉक करून पार्क केली होती.
मात्र, काही वेळाने परत आल्यानंतर मोटारसायकल तेथे आढळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय व लबाडीच्या उद्देशाने मोटारसायकल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरी गेलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे ४० हजार रुपये आहे.
याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार दि. ३० जुलै २०२६ रोजी रात्री ९.२५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.