Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या तपासाला यश; ३० दिवसांत आरोपपत्र दाखल, जलदगती न्यायालयीन प्रक्रियेत निकाल 

भोसरी एमआयडीसी….: अल्पवयीन पीडित मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासानंतर आरोपीला न्यायालयाने २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी रामू कुंजल निसाद (वय ४०, रा. शंभू कॉलनी, विनायकनगर, मोशी) याला दोषी ठरवत पिंपरी-चिंचवड जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. यादव यांनी हा निकाल २२ सप्टेंबर २०२६ रोजी दिला.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ६५(२), ७४, ३५१ तसेच POCSO कायद्यातील कलम ४, ६ व ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

३० दिवसांत आरोपपत्र दाखल

सदर गुन्हा ३ एप्रिल २०२६ रोजी दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चैत्राली भिसे यांनी केला. तपास पूर्ण करून अवघ्या ३० दिवसांच्या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. प्रकरणाची सुनावणी जलदगतीने घेण्यात यावी, अशी अभियोग पक्षाकडून न्यायालयाकडे विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करून प्रकरणाची सुनावणी जलदगतीने पूर्ण केली.

विविध कलमांखाली शिक्षा

न्यायालयाने आरोपीला BNS कलम ६४(१) अंतर्गत २० वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड, कलम ६५(२) अंतर्गत २० वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड, कलम ७४ अंतर्गत ३ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड, तर कलम ३५१ अंतर्गत ३ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

तसेच POCSO कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत प्रत्येकी २० वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड, तर कलम ८ अंतर्गत ५ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित शिक्षेत अतिरिक्त कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. वरील सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.

विशेष सरकारी अभियोक्त्यांकडून प्रभावी बाजू

या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता स्मिता मकंद चौगले यांनी सरकार पक्षातर्फे साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी मपोहवा एस. आर. सरसे यांनी न्यायालयीन कामकाजात प्रभावी समन्वय साधला.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३ मारुती जगताप, सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गणेश जामदार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया प्रभावीपणे राबवून दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता
Next Article अनंत चतुर्दशी रोजी होणा-या विसर्जन सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026

चैन स्नॅचिंगचा तपास पोहोचला पुरंदरपर्यंत; दोन गुन्ह्यांचा उलगडा

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?