Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 24, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

६ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी-अंमलदारांचा बंदोबस्त; ५१०७ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गणेशोत्सव-२०२६ शांतता, सुरक्षितता आणि मंगलमय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या व्यापक नियोजनाला यश आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने विविध स्तरांवर तब्बल १७५ बैठका घेत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या.

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत ६ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दल तसेच बाहेरील पोलीस घटकांचीही मदत घेण्यात आली.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालय स्तरावर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. तसेच परिमंडळीय पोलीस उपआयुक्त आणि पोलीस ठाणे स्तरावर शांतता समिती सदस्य व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन गणेशमूर्तीची सुरक्षित वाहतूक, स्वयंसेवकांची २४ तास उपस्थिती, सीसीटीव्ही व्यवस्था, लेझर लाईटचा वापर टाळणे तसेच ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

५१०७ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. २०२५ मध्ये ३८५६ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली होती. यंदा २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत ५१०७ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३० सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

‘एक मंडळ–एक अंमलदार’ योजना यशस्वी

गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांशी थेट संपर्क राहावा आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी ‘एक मंडळ–एक अंमलदार’ योजना १०० टक्के राबविण्यात आली.

आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा २ हजार ४११ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तर २ लाख ७० हजार १२४ घरगुती गणपतींची स्थापना करण्यात आली.

ध्वनिप्रदूषण करणाऱ्या डीजे चालकांवर कारवाई

पोलीस प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालक व मालकांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत एकूण ६३ गुन्हे दाखल करून ५८ मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये परिमंडळ-२ मध्ये ३३, परिमंडळ-१ मध्ये १६, परिमंडळ-३ मध्ये ५ आणि परिमंडळ-४ मध्ये ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनंत चतुर्दशीसाठी कडेकोट बंदोबस्त

२५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी १ हजार ३९८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार असून ६८ हजार ९९६ घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे.

या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी १ अपर पोलीस आयुक्त, ८ पोलीस उपआयुक्त, १६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ७४ पोलीस निरीक्षक, २९० सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, २७८० पोलीस अंमलदार, ६ आरसीपी, ६०२ होमगार्ड, एमआरपीएफच्या २ प्लाटून आणि १६६ वॉर्डन असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील गणेशोत्सवाची ओळख जागतिक पातळीवर निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘Bappa.org’ वर गणेश मंडळांनी नोंदणी करण्याचे आवाहनही पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले आहे.

पोलीस प्रशासनाच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत उत्सवाची शांततेत आणि मंगलमय वातावरणात सांगता करण्यात येत आहे.

Post Views: 91
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचैन स्नॅचिंगचा तपास पोहोचला पुरंदरपर्यंत; दोन गुन्ह्यांचा उलगडा
Next Article अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

चैन स्नॅचिंगचा तपास पोहोचला पुरंदरपर्यंत; दोन गुन्ह्यांचा उलगडा

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?