Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»प्रा. डॉ. राजकुमार शेलार यांना ‘राजश्री शाहू पुरस्कार २०२६’ प्रदान
पुणे ग्रामीण

प्रा. डॉ. राजकुमार शेलार यांना ‘राजश्री शाहू पुरस्कार २०२६’ प्रदान

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

इंदापूर प्रतिनिधी ….इंदापूर तालुक्यातील कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजकुमार शेलार यांना युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘राजश्री शाहू पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. राजकारण, समाजकार्य, शिक्षण व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.

डॉ. शेलार यांनी भगवान इंगळे यांच्या ‘ढोर’ या दलित आत्मकथनावर एम.फिल. पदवी संपादन केली असून, ‘भटक्या-विमुक्त जमातींची आत्मकथने : स्वरूप आणि चिकित्सा’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांच्या ‘दलित आत्मकथने आणि भगवान इंगळे यांचे ‘ढोर’ आत्मकथन’ या ग्रंथाला ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. राष्ट्र सेवा दल तसेच इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीनेही त्यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचा गौरव करून त्यांचा नागरी सत्कार केला आहे.

 

त्यांच्या संशोधन, साहित्यनिर्मिती आणि समाजप्रबोधनाच्या कार्याची दखल घेत ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक व व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कैलास कदम, प्रा. कृष्णा ताटे, आजी-माजी नगरसेवक, समाजसेवक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. शेलार म्हणाले, “‘राजश्री शाहू महाराज पुरस्कार’ स्वीकारताना माझे मन आनंद, अभिमान आणि कृतज्ञतेने भरून आले आहे. हा पुरस्कार केवळ माझा सन्मान नसून शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा आहे. युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य तसेच संस्थेचे अध्यक्ष पत्रकार शिवाजी शिंदे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी समता, सामाजिक न्याय, शिक्षण आणि मानवतेची जी मूल्ये समाजासमोर ठेवली, त्यांचा वारसा जपत शिक्षणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा माझा प्रयत्न कायम राहील. पुढील काळातही शिक्षण, संशोधन, साहित्यनिर्मिती आणि समाजहिताची कार्ये अधिक समर्पितपणे करण्याचा मी प्रयत्न करीन.”

डॉ. शेलार यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह भैय्यासाहेब रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, सर्व प्राध्यापक तसेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Views: 19
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article१२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरकुलवासीयांचा जनआक्रोश उफाळून आला!
Next Article अपघाताला आमंत्रण मिळण्यापूर्वीच नगर-मनमाड रोडचे काम पूर्ण करा…प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

समर्थ कॉलेजमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

September 16, 2026

पुरंदर तहसील कार्यालयातील २५ हजारांची लाच घेताना क्लार्क रंगेहाथ

September 4, 2026

दिवे गावचा महाराष्ट्रात डंका; साक्षी टिळेकर बी.फार्मसीत राज्यात प्रथम

August 22, 2026

जुन्नर हादरले! १० वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या; घराशेजारील २५ वर्षीय तरुण ताब्यात

August 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?