Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»वैजापूर पंचायत समितीत उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; सभापती वंदना शिंदे ॲक्शन मोडमध्ये, कारणे दाखवा नोटिसा बजावल्या
महाराष्ट्र

वैजापूर पंचायत समितीत उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; सभापती वंदना शिंदे ॲक्शन मोडमध्ये, कारणे दाखवा नोटिसा बजावल्या

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अचानक उपस्थिती तपासणी; वेळेचे पालन न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा दंडुका

वैजापूर | प्रतिनिधी विजयकुमार मोकळे …..वैजापूर पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेळेवर उपस्थितीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या सभापती वंदना बाळू शिंदे यांनी सोमवारी अचानक उपस्थिती तपासणी करत प्रशासनाला सतर्क केले. या कारवाईनंतर उशिरा कार्यालयात येणाऱ्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या.

सभापती वंदना शिंदे यांनी माजी उपसभापती प्रभाकर बारसे आणि सदस्य राहुल लांडे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयात अचानक भेट दिली. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन हजेरी रजिस्टर ताब्यात घेतले आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पाहणी केली. कार्यालय सुरू होण्याची वेळ उलटल्यानंतरही सकाळी साडेदहा वाजेपर्यंत अनेक कर्मचारी आणि अधिकारी टप्प्याटप्प्याने कार्यालयात दाखल होत असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, गटविकास अधिकारी ज्ञानेदेव (नामदेव) जायभाये हे उपविभागीय कार्यालयातील बैठकीसाठी बाहेर गेले होते. बैठकीवरून परतल्यानंतर त्यांनी तातडीने चौकशी करून विस्तार अधिकारी अमेय पवार, बी. आर. मस्के, रॉयल धुळे तसेच अभियंता मनोज उडान यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या.

याबाबत गटविकास अधिकारी जायभाये यांनी सांगितले की, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असून, भविष्यातही अशा प्रकारांवर कठोर भूमिका घेतली जाईल.

सभापती वंदना शिंदे यांनी सांगितले की, पंचायत समितीत दररोज विविध कामांसाठी सर्वसामान्य नागरिक येत असतात. मात्र, अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते. यापूर्वी सूचना देऊनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत कारवाई करण्यात आली.

या कारवाईनंतर वैजापूर तालुक्यात सभापती वंदना शिंदे यांच्या पुढाकाराचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा वचक राहिल्यास सर्वसामान्यांची कामे अधिक वेगाने आणि सुरळीत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleग्रामीण आवास योजनेला गती; लाभार्थ्यांना जागा आणि पाच ब्रास मोफत वाळू द्या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
Next Article तळवडे रोडवरील ऑटो गॅरेजमध्ये कोयत्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

राज्यातील मागासवर्गीय समाजावरील वाढते अत्याचार अत्यंत चिंताजनक; आमदार अमित गोरखे यांनी पावसाळी अधिवेशनात वेधले सरकारचे लक्ष

July 9, 2026

ग्रामीण आवास योजनेला गती; लाभार्थ्यांना जागा आणि पाच ब्रास मोफत वाळू द्या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

July 9, 2026

आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

July 6, 2026

आळंदी व देहू येथे येणाऱ्या वारकऱ्यांनी पुण्यातच वारीमध्ये सहभागी व्हावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

July 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 10, 20260

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपुलाच्या गोलाकार भागात अलीकडील मुसळधार पावसानंतर मोठे भगदाड पडल्याने वाहनचालक…

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

मोशी दुर्घटनास्थळी उपमहापौर शर्मिला बाबरांची पाहणी; बाधित कुटुंबीयांना दिला धीर

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?