Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»राज्यात १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात
महाराष्ट्र

राज्यात १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर;लोणावळा येथे ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई, दि. ६ जुलै : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF आणि) ६ राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे.

मान्सुन कालावधीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)पथके पुर्व तैनात करताना पालघर व नागपूर येथे प्रत्येकी २ आणि पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व धाराशिव प्रत्येकी १ पथके मुंबई येथे ४ पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची एकूण ६ सज्ज असून धुळे व नागपूर प्रत्येकी २ आणि नांदेड, गडचिरोली पथके तैनात आहेत.

मुंबईतील सांताक्रूझ येथे १५१.२ मिमी तर कुलाबा येथे १२८ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय लोणावळा येथे ६७० मिमी, अंबोना येथे ५३७ मिमी, ताम्ह‍िणी येथे ५८० मिमी, भिवपुरी येथे २६६ मिमी, विभाग येथे ३०५ मिमी, निलशी येथे २७५ मिमी, मुळशी येथे २३० मिमी, माथेरान येथे ३०२ मिमी, कर्जत येथे २९१.५ मिमी, पनवेल येथे १८२.५ मिमी, जुहू विमानतळ येथे ३२५.० मिमी आणि भाईंदर येथे १८८.५ मिमी पावसाची नोंद झाली.

माथेरान, लोणावळा, खोपोली व लोहगड परिसरात पावसाची तीव्रता अत्यंत जास्त असल्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा व राष्टीय प्रतिसाद बल यांच्याशी सतत समन्वय साधून बचाव कार्य चालू आहेत SEOC मधून GEO-DSS प्रणाली चा वापर करून धोका आणि प्रवणतेचे सखोल विश्लेषण करून अलर्ट प्रसारित करण्यात येत आहेत.

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळी असल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे.खोपोली येथे पाणी साचल्याने जुना महामार्ग बंद आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे , मिसिंग लिंक रस्ता, दरड कोसळुन एक्सप्रेस-वे दोन्ही बाजूंची वाहतुक बंद आहे. मंकी हिल ते ठाकुरवाडी पर्यंत दरड कोसळल्या रेल्वे वाहतुक बंद आहे. पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बंद आहे. रस्ते व रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी दरडी हटवण्याचे काम युध्दपातहीवर सुरू आहे.

मावळ तालुक्यातील घोरावाडी येथे (तळेगाव दाभाडे) पुरामध्ये एक बस २५ नगरिकांसाहित अडकली होती, NDRF पथक पाठवून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

मावळ मधील पाटण येथे एक घर दरडी खाली दबले असून ३ ते ४ नागरिक दबले असण्याची शक्यता आहे. तेथे NDRF टीम पाठविण्यात आली असून बचावय कार्य चालू आहे. मानखुर्द येथे झोपडपट्टीवर इमारत कोसळुन ६ जणांचा मुत्यु व १ जखमी झाले असून बचाव कार्य चालू असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभीषण परिस्थिती! पुण्यात पहिल्याच पावसात अनेक भाग जलमय; राष्ट्रवादीचे नगरसेवक ग्राऊंड लेवलवर;थेट छातीएवढ्या पाण्यात उतरले; पूरस्थितीची केली पाहणी
Next Article पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४ बाय ७ ‘अलर्ट मोड’वर ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

राज्यातील मागासवर्गीय समाजावरील वाढते अत्याचार अत्यंत चिंताजनक; आमदार अमित गोरखे यांनी पावसाळी अधिवेशनात वेधले सरकारचे लक्ष

July 9, 2026

वैजापूर पंचायत समितीत उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; सभापती वंदना शिंदे ॲक्शन मोडमध्ये, कारणे दाखवा नोटिसा बजावल्या

July 9, 2026

ग्रामीण आवास योजनेला गती; लाभार्थ्यांना जागा आणि पाच ब्रास मोफत वाळू द्या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

July 9, 2026

आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

July 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?