Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»देहूरोड रक्ताने माखलं! कुऱ्हाड-कोयत्याच्या हल्ल्यांनी दोन कुटुंबं हादरली
पिंपरी चिंचवड

देहूरोड रक्ताने माखलं! कुऱ्हाड-कोयत्याच्या हल्ल्यांनी दोन कुटुंबं हादरली

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 22, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

देहूरोड, दि. २१ जून – देहूरोड परिसरात गुन्हेगारीचा थरार अक्षरशः रस्त्यावर उतरल्याचे चित्र समोर आले आहे. एका बाजूला नातेवाईकांतील जुन्या वादाचा राग मनात धरून चौघांनी रिक्षाचालकाला गाठत त्याच्यावर लाथाबुक्क्या, लाकडी दांडक्यांचा मारा केला आणि शेवटी कुऱ्हाडीने वार करत रक्तबंबाळ केले; तर दुसऱ्या प्रकरणात केवळ दुचाकीवरून ‘कट मारला’ या कारणावरून तीन विधी संघर्षित बालकांनी तरुणाला बेदम मारहाण करत कोयत्याच्या घावात त्याचा अंगठाच छाटला. अवघ्या काही तासांत घडलेल्या या दोन थरारक घटनांनी देहूरोड परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

जुना वाद पेटला… आणि नातेवाईकांनीच कुऱ्हाड उगारली!

देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, प्रदीप भिमराव गायकवाड (वय ४६, रिक्षाचालक, रा. चिंचोली, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रेम ऊर्फ सनी अनिरुद्ध चोपडे, प्रणव मिलिंद चोपडे, अनुराधा सूर्यकांत चोपडे आणि अक्षय अनिल चोपडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जूनच्या रात्री साडेअकराच्या सुमारास चिंचोली येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाजवळ ही रक्तरंजित घटना घडली. सुमारे महिनाभरापूर्वी जागेच्या साफसफाईवरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. मात्र नातेसंबंध असल्याने तेव्हा तक्रार देण्यात आली नव्हती. पण हा वाद आरोपींनी मनात धरला आणि संधी साधून फिर्यादीला गाठले. आधी शिवीगाळ, त्यानंतर लाथाबुक्क्या, मग लाकडी दांडक्यांनी मारहाण… आणि शेवटी कुऱ्हाडीने हल्ला करून फिर्यादीला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.

नातेवाईकांकडूनच असा जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खणसे करत आहेत.

‘कट’चा वाद थेट कोयत्यापर्यंत; तरुणाचा अंगठाच तोडला

देहूरोडमधील दुसरी घटना तर आणखी धक्कादायक ठरली. २१ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास संतोष स्वीटजवळील जितू पानटपरीसमोर ही थरारक मारहाण झाली. या प्रकरणी शशिकांत नागेश मासे (वय ४३, व्यवसाय – गॅरेज, रा. पोर्टर चाळ, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन विधी संघर्षित बालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा तुषार मासे आणि त्याचा मित्र अर्जुन भुंभक हे दुचाकीवर उभे असताना, दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून ‘कट’ मारल्याच्या किरकोळ कारणाचा राग मनात धरून तीनही बालकांनी संगनमताने त्यांच्यावर हल्ला चढवला. सुरुवातीला तुषारला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. त्यानंतर एका विधी संघर्षित बालकाने आपल्या ताब्यातील लाकडी मुठीच्या लोखंडी कोयत्याने तुषारवर सपासप वार केला. या हल्ल्यात तुषारच्या उजव्या हाताचा अंगठा पंजापासून वेगळा झाला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांसह शस्त्र कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

देहूरोडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धाबे दणाणले

अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटनांनी देहूरोडमधील वाढती हिंसा आणि बिनधास्त गुन्हेगारी पुन्हा उघड्यावर आणली आहे. किरकोळ कारणांवरून थेट कुऱ्हाड, कोयता यांसारखी धारदार शस्त्रे वापरली जात असतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो. नातेसंबंध, किरकोळ वाद, कट मारल्याची चिडचिड — आणि त्यातून थेट जीवघेणे हल्ले, हे चित्र अत्यंत भयावह असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू केला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Post Views: 27
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलिंक्डइनवरून नोकरीचे आमिष; सांगवीत १.७२ लाखांची ऑनलाइन फसवणूक
Next Article “मेट्रो स्टेशनजवळ मध्यरात्री अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू”
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?