Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वाहतूक नियमभंगाविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई
पिंपरी चिंचवड

जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वाहतूक नियमभंगाविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कारवाई दरम्यान १९,०३५ वाहनचालकांकडून १.८५ कोटींचा दंड वसूल

पिंपरी, दि. १८ जून : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवत १९ हजार ३५ वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण १ कोटी ८५ लाख १३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक, आयटी आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे, हिंजवडी, तळवडे व चिखली येथील आयटी पार्क तसेच देहू-आळंदीसारखी तीर्थक्षेत्रे यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि वाहनांची वर्दळ असते. याशिवाय आयुक्तालयाच्या हद्दीतून पाच प्रमुख महामार्ग जात असल्याने वाहतुकीवरील ताण सातत्याने वाढत आहे.

वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक नियमभंग आणि वाहनांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, सहपोलीस आयुक्त शशीकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते १५ जून २०२६ या कालावधीत विशेष कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत काळी काच लावलेल्या २,५६२ वाहनांवर, मॉडिफाईड सायलेंसर वापरणाऱ्या १,०१८ वाहनांवर, जड व अवजड वाहनांच्या ४,४४४ चालकांवर, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व नो-पार्किंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०,६०७ वाहनचालकांवर तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ४०४ चालकांवर कारवाई करण्यात आली.

वाहतूक शाखेने नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून नियमभंग केल्यास दंडात्मक तसेच न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे स्पष्ट केले आहे. तसेच वाहतूक कोंडी, वाहतूक नियमन आणि इतर वाहतूकविषयक समस्यांच्या निवारणासाठी ‘ट्रॅफिक बडी’ व्हॉट्सॲप चॅटबॉट (८७८८६४९८८५) चा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारीही कॅश काऊंटर राहणार सुरू
Next Article पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ८३ किलो गांजासह दोन तस्कर जेरबंद, ५७.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?