Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारीही कॅश काऊंटर राहणार सुरू
पिंपरी चिंचवड

मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारीही कॅश काऊंटर राहणार सुरू

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे १२ दिवस शिल्लक

पिंपरी, दि. १८ जून २०२६:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून नागरिकांना देण्यात आलेल्या विविध कर सवलतींचा अधिकाधिक लाभ घेता यावा यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारी (२० व २१ जून तसेच २७ व २८ जून) महापालिकेच्या सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांमधील कॅश काऊंटर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १८ जून पर्यंत ३८१ कोटी ६० लाख रुपयांचा कर भरणा झाला आहे.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी आर्थिक वर्षाच्या प्रारंभी मालमत्ताधारकांना विविध सवलती जाहीर केल्या जातात. यंदाही ३० जून २०२६ पर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षक सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांपर्यंत सवलतींची माहिती पोहोचवण्यासाठी कर संकलन विभागाकडून एसएमएस, दूरध्वनीद्वारे संपर्क, जनजागृती मोहिमा, होर्डिंग्ज, सामाजिक माध्यमे तसेच विविध प्रचार माध्यमांचा वापर करून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक विभागीय कार्यालयातील सहायक मंडल अधिकारी आणि गट लिपिक मालमत्ताधारकांशी थेट संपर्क साधून त्यांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

या प्रयत्नांमुळे चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये कर संकलनाला गती मिळाली असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कर वसुली झाली आहे. ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध असली तरी अनेक नागरिक प्रत्यक्ष कार्यालयात येऊन रोखीने किंवा इतर माध्यमांतून कर भरत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि शेवटच्या दिवसांतील गर्दी कमी करण्यासाठी शनिवार व रविवारीही कॅश काऊंटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महापालिकेच्या वतीने सर्व मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात येत आहे की, उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावा आणि शहर विकासात आपले योगदान नोंदवावे.

“शहराच्या प्रगतीमागे करदात्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि इतर नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. महापालिकेने दिलेल्या सवलतींचा लाभ घेत प्रत्येक नागरिकाने ‘माझा कर, माझे शहर’ ही भावना जपावी”
…….रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
“करदात्यांना अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने शनिवार व रविवारीही कॅश काऊंटर सुरू ठेवण्यात आले आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. उपलब्ध सुविधांचा उपयोग करून नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वी कर भरणा करावा”
…..डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
“३० जून ही सवलतींचा लाभ घेण्याची अंतिम संधी आहे. कर संकलन विभागाकडून एसएमएस, दूरध्वनी, जनजागृती मोहिमा आणि प्रत्यक्ष भेटींद्वारे मालमत्ताधारकांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. शेवटच्या दिवसांतील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा”
 ……सचिन पवार , उपायुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या टीमची महापौर रवि लांडगे यांना सदिच्छा भेट
Next Article जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वाहतूक नियमभंगाविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?