Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापौर रवि लांडगे यांची दूरदर्शी संकल्पना; पिंपरी-चिंचवडला मिळणार ‘पुस्तकांची नगरी’ म्हणून नवी ओळख
पिंपरी चिंचवड

महापौर रवि लांडगे यांची दूरदर्शी संकल्पना; पिंपरी-चिंचवडला मिळणार ‘पुस्तकांची नगरी’ म्हणून नवी ओळख

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 18, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
सीएसआर निधीतून साकार होणार ‘अक्षरविश्व’ ज्ञानसंकुल; महापालिकेवर एक रुपयाचाही आर्थिक भार नाही
निधी कमी पडल्यास महापौर स्वतः करणार आर्थिक मदत

पिंपरी, दि. १८ जून २०२६ – पिंपरी चिंचवड शहराला केवळ औद्योगिक नगरी म्हणून नव्हे, तर ज्ञान, साहित्य, संस्कृती आणि संशोधनाचे केंद्र म्हणून नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने महापौर भा. रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘अक्षरविश्व’ या अत्याधुनिक ज्ञानसंकुलाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. १५ जून २०२६ रोजी झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मौजे भोसरी (कासारवाडी) येथील सार्वजनिक सुविधा क्षेत्रातील सुमारे ८,८३१.३६ चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक ग्रंथालय आणि ज्ञानसंकुल उभारण्याच्या उपसूचनेस मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प आनंदग्राम सामाजिक सेवाभावी संस्था, भोसरी यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण ‘अक्षरविश्व’ ज्ञानसंकुल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून उभारण्यात येणार असून महानगरपालिकेच्या निधीतील एकही रुपया खर्च होणार नाही. त्यामुळे शहरवासीयांना जागतिक दर्जाच्या ज्ञानसुविधा उपलब्ध होणार असून त्यासाठी महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. विशेष म्हणजे, प्रकल्पासाठी निधी कमी पडल्यास स्वतः आर्थिक योगदान देण्याची तयारी महापौर रवि लांडगे यांनी दर्शविली आहे.

‘अक्षरविश्व’ हे केवळ ग्रंथालय नसून एक सर्वसमावेशक ज्ञानसंकुल असेल. यामध्ये अत्याधुनिक ग्रंथालय, डिजिटल अभ्यासिका, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, संशोधन सुविधा, मराठी साहित्य परिषद कार्यालय, मनोमय कक्ष, व्याख्यान सभागृह, लेखक संवाद केंद्र, पुस्तक प्रकाशनासाठी स्वतंत्र सभागृह तसेच विविध शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

महापौर रवि लांडगे यांची संकल्पना शहरातील विद्यार्थी, युवक आणि अभ्यासकांना पुणे, मुंबई अथवा इतर महानगरांमध्ये उपलब्ध असणाऱ्या दर्जेदार ज्ञानसुविधा पिंपरी-चिंचवडमध्येच उपलब्ध करून देण्याची आहे. आज अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि संशोधनासाठी इतर शहरांकडे वळतात. मात्र ‘अक्षरविश्व’ उभारल्यानंतर पिंपरी-चिंचवड हेच अभ्यास, संशोधन आणि वाचन संस्कृतीचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होणार आहे.

या ज्ञानसंकुलामुळे राज्यातील आणि देशातील नामवंत लेखक, साहित्यिक, कवी, विचारवंत, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे शहरात सातत्याने आगमन होईल. साहित्य संमेलने, पुस्तक प्रदर्शने, व्याख्यानमाला, लेखक भेट कार्यक्रम, चर्चासत्रे आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे शहरात समृद्ध बौद्धिक वातावरण निर्माण होईल.

येत्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडची ओळख केवळ उद्योगनगरी म्हणून नव्हे, तर ‘पुस्तकांची नगरी’, ‘ज्ञाननगरी’ आणि ‘वाचन संस्कृतीचे केंद्र’ म्हणून निर्माण करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखक, साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांचे हे आवडते केंद्र बनू शकते.

महापौर रवि लांडगे यांनी शहराच्या विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक केला आहे. रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि इतर भौतिक सुविधांसोबतच भावी पिढ्यांसाठी ज्ञानाची भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली आहे. ‘अक्षरविश्व’ ही त्याच दूरदृष्टीची फलश्रुती आहे.

विशेष म्हणजे, या प्रकल्पाची संपूर्ण अंमलबजावणी पारदर्शक, नियमबद्ध आणि सार्वजनिक हिताला केंद्रस्थानी ठेवून करण्यात येणार आहे. उभारण्यात येणाऱ्या सर्व सुविधा शहरातील नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध राहणार असून ही वास्तू पिंपरी-चिंचवडच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक वैभवाची नवी ओळख ठरणार आहे.

“उद्योगनगरी म्हणून देशभरात नाव कमावलेल्या पिंपरी-चिंचवडला आता ‘ज्ञाननगरी’ आणि ‘पुस्तकांची नगरी’ म्हणून नवी ओळख मिळवून देणे, हीच ‘अक्षरविश्व’मागची प्रेरणा आहे. भावी पिढ्यांसाठी ज्ञानाचा कायमस्वरूपी ठेवा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘अक्षरविश्व’ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो केवळ एका इमारतीपुरता मर्यादित राहणार नाही, तर पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि बौद्धिक पुनर्जागरणाचा भक्कम पाया ठरेल”
               – रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार –मंत्री हसन मुश्रीफ
Next Article नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर कार्यवाहीला प्राधान्य द्या : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?