Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार –मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई

सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार –मंत्री हसन मुश्रीफ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
RAJU DONGARE Govt Photographer
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर वाढीव खाटांनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यामुळे रुग्णसेवा अधिक सक्षम होण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ताही उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या वाढीव खाटांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुश्रीफ बोलत होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, संचालक पल्लवी सापळे, उपसचिव संदीप ढाकणे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत राज्यातील रुग्णालयांमधील वाढता रुग्णभार, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषांनुसार आवश्यक पदांची उपलब्धता आणि भविष्यातील गरजांवर चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये दरवर्षी एक कोटीपेक्षा अधिक बाह्यरुग्णांना तसेच 10 लाखांहून अधिक आंतररुग्णांना सेवा दिली जाते. या रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत आहे. त्यामुळे रुग्णसेवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि अध्यापन व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अतिरिक्त पदनिर्मितीची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आणि आयपीएचएसच्या निकषांनुसार कार्यरत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे. रुग्णांना दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा मिळावी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

वाढीव सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. वित्त विभागाशी झालेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव आकृतिबंधाच्या निकषांनुसार अधिक परिष्कृत करून सादर करण्यात येणार आहे. या पदनिर्मितीमुळे डॉक्टर, प्राध्यापक, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढेल आणि रुग्णसेवा अधिक परिणामकारक होईल. प्रस्ताव लवकर अंतिम करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांची क्षमता वाढविणे, रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम करणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ
Next Article महापौर रवि लांडगे यांची दूरदर्शी संकल्पना; पिंपरी-चिंचवडला मिळणार ‘पुस्तकांची नगरी’ म्हणून नवी ओळख
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

June 17, 2026

उन्हाच्या झळांपासून दिलासा; मुंबई-नवी मुंबईत मान्सून पूर्व पाऊस,रविवारची सुरुवात आल्हाददायक वातावरणात

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?