पिंपरी-चिंचवड, : वाकड पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिच्याकडून गांजा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई गोविंद देवराव डोके (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क) व २०(ब)(ii)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १६ जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास म्हातोबा नगर, वाकड येथील गीता यादव यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी राधिका मुकेश यादव (वय २२, रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड, पुणे) हिच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ठेवलेला १६४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे ८ हजार ७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आरोपी महिला अद्याप अटकेत नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.