Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड महापालिकेची १ जुलैपासून विशेष मालमत्ता कर वसुली मोहीम
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेची १ जुलैपासून विशेष मालमत्ता कर वसुली मोहीम

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

३० जूनपर्यंत १० टक्के सवलतीचा घेता येणार लाभ, त्यानंतर थकबाकीदारांवर कठोर कारवाई

पिंपरी, दि.१८ जून २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी १ जुलै २०२६ पासून मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना बिल वाटपासोबत जप्तीपूर्व नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही कर भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये निवासी मालमत्तांचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करणे तसेच व्यावसायिक आणि बिगरनिवासी मालमत्तांवर जप्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे.

महापालिकेकडून मालमत्ताधारकांना ३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरल्यास सामान्य करावर १० टक्के सवलत दिली जात आहे. याशिवाय पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी विविध प्रोत्साहनपर सवलतींचीही तरतूद करण्यात आली आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अवघे १३ दिवस शिल्लक असल्याने नागरिकांनी विलंब न करता कर भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी १ जुलैपासून सर्व विभागीय कार्यालयांमध्ये विशेष वसुली पथके तयार करण्यात येणार असून, मोठ्या थकबाकीदारांकडून वसुलीवर विशेष भर दिला जाणार आहे. वारंवार आवाहन करूनही कर भरणा न करणाऱ्या निवासी मालमत्तांचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करणे, तसेच व्यावसायिक व बिगरनिवासी मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिकेने कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीपर्यंत प्रतीक्षा न करता त्वरित कराचा भरणा करून ३० जून २०२६ पर्यंत उपलब्ध असलेल्या सवलतींचा लाभ घ्यावा. तसेच जप्ती आणि दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाने केले आहे.

३५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांना दिली नोटीस

महापालिकेच्या हद्दीत एकूण ७ लाख ४४ हजार ६०३ मालमत्तांची नोंद असून, १७ जून २०२६ अखेरपर्यंत सुमारे ३७० कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. आतापर्यंत ३ लाख ३९ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. वसुली मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरातील थकबाकीदारांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला असून, ३५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस प्राप्त होऊनही कर न भरलेल्या मालमत्तांवर महापालिकेकडून कोणत्याही वेळी जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती कर संकलन व कर आकारणी विभागातून देण्यात आली आहे.

“महापालिकेने मालमत्ताधारकांना ३० जूनपर्यंत १० टक्के सवलतीची विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत कर भरणाऱ्या नागरिकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. मात्र, वारंवार आवाहन करूनही कर भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर १ जुलैपासून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता तात्काळ मालमत्ता कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा आणि कारवाई टाळावी”
…..रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मालमत्ता कराचे उत्पन्न अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी दिलेला कर हा विकासकामांसाठी थेट उपयोगात येतो. त्यामुळे मालमत्ताधारकांनी उपलब्ध सवलतींचा लाभ घेत ३० जून २०२६ पूर्वी कर भरणा करावा. कर भरण्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शहराच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. मुदत संपल्यानंतर थकीत करावरील वसुली आणि कायदेशीर कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल”
…..डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘आयर्नमॅन’ विजेत्या थेरगावच्या कपूर दांपत्याचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते गौरव
Next Article रेल्वे व वन विभागात नोकरीचे आमिष दाखवून २१.८७ लाखांची फसवणूक; काळेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?