Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»‘आयर्नमॅन’ विजेत्या थेरगावच्या कपूर दांपत्याचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते गौरव
पिंपरी चिंचवड

‘आयर्नमॅन’ विजेत्या थेरगावच्या कपूर दांपत्याचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते गौरव

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

एशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत फडकवला तिरंगा

पिंपरी, दि.१८ जून २०२६ : जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘आयर्नमॅन’ (Ironman) या जागतिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन करून पिंपरी-चिंचवड शहराची मान जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या थेरगाव येथील रहिवासी श्री. दिनेश कपूर आणि श्रीमती योगिता कपूर या दांपत्याचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात विशेष गौरव करण्यात आला. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या दांपत्याचा सत्कार करण्यात आला.

जर्मनीच्या भूमीवर फडकवला भारताचा तिरंगा

जर्मनीतील हॅम्बर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘युरोपियन चॅम्पियनशिप’मध्ये कपूर दांपत्याने आपली जिद्द आणि चिकाटी सिद्ध केली. या स्पर्धेमध्ये ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर मॅरेथॉन धावणे हे तीन अत्यंत खडतर टप्पे एकाच दिवसात पूर्ण करावे लागतात. दिनेश कपूर आणि योगिता कपूर यांनी हे आव्हान लीलया पेलत अवघ्या १४ तास १३ मिनिटे २८ सेकंदांत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आणि फिनिश लाईनवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला.

या गौरव सोहळ्याला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे आणि नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य, क्रीडा विभागासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते. कपूर दाम्पत्य हे पिंपरी चिंचवड शहरातील पहिले ‘आयर्नमॅन’ ठरले आहेत. कपूर दांपत्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला असून, संपूर्ण शहरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

‘फिटनेस’ला वयाचे बंधन नसते: दिनेश कपूर

सत्काराला उत्तर देताना दिनेश कपूर यांनी आपल्या प्रवासाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, “वयाच्या पन्नाशीनंतर ही स्पर्धा पूर्ण करणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. फिटनेससाठी वय हा कधीही अडथळा नसतो; गरज असते ती केवळ प्रबळ इच्छाशक्ती, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सातत्याची. टाटा मोटर्समधील माझ्या सेवाकाळात फुटबॉल खेळल्याचा फायदा मला या स्पर्धेसाठी झाला.” योगिता कपूर यांनी या प्रवासात एकमेकांना मिळालेल्या मानसिक आधाराचे महत्त्व अधोरेखित केले.

“कपूर दांपत्याचे हे यश केवळ एक पदक नाही, तर ते पिंपरी-चिंचवडच्या जिद्दीचे आणि संयमाचे प्रतीक आहे. आजच्या धकाधकीच्या युगात, जिथे अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, तिथे वयाच्या पन्नाशीनंतरही आरोग्याप्रती इतके समर्पण ठेवून, हजारो किलोमीटर दूर जाऊन, पिंपरी चिंचवड शहराचे नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे व देशाचेही नाव उंचावणे ही खरोखरच थक्क करणारी आणि अभिमानास्पद बाब आहे. थेरगावच्या मातीत निर्माण झालेले हे खेळाडू आज जागतिक स्तरावर आदर्श ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे आपल्या शहरातील युवा पिढीला आणि विशेषतः महिलांना तंदुरुस्तीचे (Fitness) महत्त्व समजेल. त्यांच्या भावी वाटचालीस आमच्याकडून शुभेच्छा.” 

…..अभिषेक बारणे, सभापती स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.
Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमंठा पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
Next Article पिंपरी चिंचवड महापालिकेची १ जुलैपासून विशेष मालमत्ता कर वसुली मोहीम
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?