Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पाणी बचतीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी चिंचवड

पाणी बचतीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अल निनोच्या परिणामामुळे पावसाला विलंब; पाण्याचा अपव्यय टाळून पावसाचे पाणी साठवण यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे आवाहन

पिंपरी, दि. १६ जून २०२६ : शहरातील जलस्रोतांवरील वाढता ताण आणि यंदा अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनला होत असलेला विलंब लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून पाणी बचतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांना पाणी बचतीसंदर्भात विविध उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहन धुण्याचे टाळावे. व्यावसायिक वाहन धुलाई केंद्रांनी पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या यंत्रणांचा वापर करावा. तसेच खासगी व सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये नवीन पाणी भरणे शक्यतो टाळावे.

घरगुती तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये फ्लश टँक, नळ, पाईपलाईन आणि इतर जलवाहिन्यांमधील गळती तात्काळ दुरुस्त करावी. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी सर्व नळांना एरेटर्स बसविण्याचा आग्रह करण्यात आला आहे. पाणी वापरातील कार्यक्षमता वाढविणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे.

शहरातील उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर आणि पाण्याची दीर्घकालीन उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक स्तरावर पाणी बचतीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरगुती पातळीवर गळती रोखणे, एरेटर्सचा वापर करणे, वाहन धुण्यासाठी नळाचे पाणी टाळणे तसेच पावसाचे पाणी साठवण यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, या उपाययोजनांचा अवलंब करावा. नागरिकांच्या सहकार्यामुळेच शहराची जलसुरक्षा अधिक मजबूत होईल, असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी व्यक्त केले

तर पाणी बचत ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सोसायट्या, व्यावसायिक आस्थापने, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी नियमितपणे पाणी वापराचा आढावा घेऊन बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, पाण्याचा पुनर्वापर वाढविणे आणि अपव्यय टाळणे यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यास मोठी मदत होईल, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता महेश बरिदे यावेळी म्हणाले.

शहरातील सर्व गृहसंस्था, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि उद्योगांनी त्यांच्या परिसरातील रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी साठवण) यंत्रणा तपासून त्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवाव्यात. यंत्रणांची साफसफाई, दुरुस्ती आणि देखभाल वेळेत पूर्ण करून पावसाचे पाणी भूगर्भात मुरविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

तसेच रस्ते, पदपथ, आवार किंवा वाहनांची अनावश्यक धुलाई, बागांना अतिरिक्त पाणी देणे, ओव्हरहेड टाक्यांमधून पाणी वाहून जाऊ देणे, अशा प्रकारचा अपव्यय टाळावा. सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांनी नियमितपणे पाणी वापराचा आढावा घेऊन बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात.

“पाणी हा केवळ नैसर्गिक संसाधन नसून भावी पिढ्यांसाठीचा अमूल्य ठेवा आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा कालावधी अनिश्चित होत असून पाणी उपलब्धतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पाणी टंचाईसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात पाणी बचतीच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. वाहन धुणे, पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे, पावसाचे पाणी साठवणे आणि जलसंवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे ही काळाची गरज आहे. पिंपरी चिंचवडकरांनी जबाबदार नागरिक म्हणून पुढाकार घेतल्यास शहराला शाश्वत जलव्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल बनविता येईल.”

-रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

“यंदा अल निनोच्या परिणामामुळे पावसाचे आगमन अपेक्षेपेक्षा लांबणीवर पडल्याने जलसाठ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल आणि जलस्रोतांवरील ताण लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. आज केलेली पाणी बचत उद्याच्या पिढ्यांसाठी अमूल्य ठरणार आहे. त्यामुळे पाणी जपा, पाणी वाचवा आणि जलसंवर्धनाच्या उपक्रमात सहभागी व्हा”

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक ४ जुलै रोजी
Next Article जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मिळते सर्वांगीण शिक्षण : अजय इंगळे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?