मुंबई : दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणूक २०२६ संदर्भातील अंतिम मतदार यादी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून ती संस्थेच्या नोटीस बोर्डावरही प्रदर्शित करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षक तथा फीट पर्सन कि. दे. तळोकार यांनी दिली.
संस्थेच्या विविध पदांसाठीची निवडणूक शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या कार्यालयात होणार आहे.
निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व पात्र मतदार सदस्यांनी मतदानाच्या वेळी संस्थेचे वैध सदस्यत्व ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी कि. दे. तळोकार हे निरीक्षक तथा फीट पर्सन म्हणून कार्यरत असून सुरेंद्र कुलकर्णी, मंदार भारदे आणि सुरज पंडीत हे सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
