Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

August 14, 2026

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
महाराष्ट्र

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, प्रतिनिधी : धुळे जिल्हातील देवपूर येथील हरिजन सेवक संघ संचलित राजेंद्र छात्रालय वसतिगृह परिसरात प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालयाच्या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालयाच्या उर्वरित इमारतीच्या बांधकामासंदर्भात झालेल्या बैठकीत सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सहसचिव सोमनाथ बागुल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सामजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले, यापूर्वी हा प्रकल्प एका विशिष्ट योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, त्या योजनेची मुदत संपुष्टात आल्याने उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणींवर आवश्यक तोडगा काढून सुधारित प्रस्ताव सादर करण्यात यावा, त्यानंतर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेऊन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जतन आणि प्रसार करणारे हे स्मारक व ग्रंथालय सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून, प्रकल्पाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्ये लक्षात घेऊन त्याचे काम मार्गी लावण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. संबंधित विभागाने नियमानुसार आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’
Next Article शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘एक अटल भारत’ नाटकाद्वारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

August 10, 2026

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार ….मंत्री प्रकाश आबिटकर

August 8, 2026

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी ….केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

August 8, 2026

‘दादा’ : शिक्षणातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारा महामानव – डॉ.भरत चव्हाण पाटील

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 20260

‘उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत’; वीजदर, डेटा सेंटर आणि औद्योगिक धोरणावर सरकारला घेरले पुणे,चाकण प्रतिनिधी :…

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026

मोटोहाऊस इंडियाच्या विस्ताराला वेग; पुण्यात ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्सचे फ्लॅगशिप शोरूम

August 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?