पिंपरी, : संत तुकारामनगर पोलिसांनी गांधीनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कामगार भवनच्या पाठीमागे, कन्नड गल्ली, दुर्गामाता मंदिराजवळ, गांधीनगर पिंपरी येथे काही व्यक्ती आर्थिक फायद्यासाठी तीन पत्तीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
या प्रकरणी पोलीस शिपाई सुनिल ज्ञानोबा धावारे (बकल नं. ३११७), संत तुकारामनगर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सैदप्या सकरच्या नाटेकर (वय ५३), पांडुरंग विठ्ठल सोनपाखरे (वय ५६), गंगाराम धोंडुराम बनपट्टे (वय ४२), हनुमंत अशोक भिंगे (वय ६०), दिलीप शिवाजी बोराट (वय ६०) आणि लक्ष्मण मायराष्णा मोजे (वय ३५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून ३ हजार ३० रुपये रोख रक्कम तसेच तीन पत्तीच्या पत्त्यांचा संच जप्त करण्यात आला. आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करीत आहेत.
