पिंपरी-चिंचवड, : दिघी-आळंदी रस्त्यावरील मॅगझीन चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व अश्लील शब्दांचा वापर करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित महिलेने फिर्यादी व इतर व्यक्तींना उद्देशून अश्लील हावभाव केले तसेच अश्लील शब्द उच्चारले. याशिवाय फिर्यादी यांच्या अंगावर हात फिरवत जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होईल आणि सार्वजनिक ठिकाणी असभ्य वातावरण निर्माण होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (पिटा अॅक्ट) कलम ८ अन्वये गुन्हा क्रमांक २८१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे (वय ३५) यांनी दिली असून आरोपी महिलेला बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.