Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या खांद्यावर आणखी एक मोठी जबाबदारी
पिंपरी चिंचवड

स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या खांद्यावर आणखी एक मोठी जबाबदारी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 16, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
प्रारूप विकास आराखडा ‘नियोजन समिती’वर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची निवड; पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘रोडमॅप’ ठरणार
आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या ‘व्हिजन २०४१’ ला मिळणार गती; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या आगामी २० वर्षांतील विकासाची दिशा आणि चेहरामोहरा ठरवणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रारूप विकास आराखडा ‘नियोजन समिती”वर महापालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी सोपवण्यात आली असून, यामुळे शहराच्या नियोजन प्रक्रियेत सिव्हील इंजिनियर आणि दांडगा प्रशासकीय अनुभव असलेल्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे, त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा शहर विकासाला होणार आहे.

 आमदार शंकरभाऊ जगताप यांचे नेतृत्व आणि ‘व्हिजन’

शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आमदार शंकरभाऊ जगताप यांनी नेहमीच सूक्ष्म नियोजनावर भर दिला आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाढती लोकसंख्या, वाहतुकीचे जटील प्रश्न आणि विस्तारणाऱ्या नागरी सीमा लक्षात घेऊन त्यांनी शहरासाठी ‘व्हिजन २०४१’ समोर ठेवले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अभिषेक बारणे यांची या समितीवर वर्णी लागल्याने, प्रशासकीय नियोजनाला आता प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळणार आहे.

स्थायी समिती सभापती म्हणून अनुभवाचा फायदा

अभिषेक बारणे सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून यशस्वीरीत्या जबाबदारी सांभाळत आहेत. महापालिकेचा मुख्य आर्थिक कणा असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना शहराच्या अर्थसंकल्पीय तरतुदी आणि विविध विकासकामांच्या अंमलबजावणीचा थेट अनुभव आहे. ९ हजार कोटींहून अधिक रकमेचा अर्थसंकल्प हाताळण्याचा त्यांचा हा अनुभव आता शहराच्या भौतिक आणि धोरणात्मक नियोजनात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः विकास आराखड्यातील प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करणे यामुळे अधिक सुलभ होणार आहे.

नागरिकांच्या सूचनांचा आदर होणार; लोकसहभागातून आदर्श आराखडा व प्रारूप विकास आराखडा

‘नियोजन समिती’ हा केवळ शासकीय दस्तावेज न राहता तो थेट जनतेच्या हिताचा असावा, यासाठी लोकसहभागावर विशेष भर दिला जाणार आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, तज्ज्ञ, वास्तूविशारद आणि सर्वसामान्य नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक विधायक सूचनेचा आणि हरकतीचा या समितीमध्ये आदर केला जाईल. नवीन आराखडा अंतिम करताना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वयाचा दुवा म्हणून ही समिती काम करेल. नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊनच पिंपरी-चिंचवडच्या उज्ज्वल भविष्याचा अंतिम नकाशा तयार केला जाईल, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला आहे.

“पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आहे. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्थायी समितीचा सभापती म्हणून काम करताना मला शहराच्या आर्थिक आणि नागरी गरजांची जवळून ओळख झाली आहे. आता विकास आराखडा समितीच्या माध्यमातून शहराचा पुढील २० वर्षांचा विचार करून शाश्वत आणि पारदर्शक नियोजन करण्याला माझे प्राधान्य असेल. सर्वसामान्यांच्या हिताचा आणि शहराच्या वैभवात भर घालणारा ‘आदर्श’ आराखडा तयार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.

नव्या आराखड्याचे प्रमुख पैल

💮पिंपरी-चिंचवडचा १९९७ चा विकास आराखडा आता जुना झाला असून, नवीन आराखडा हा शहराच्या भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल. या समितीच्या माध्यमातून खालील ५ मुख्य संकल्पांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे:

💮वाहतूक क्रांती: मेट्रो मार्गांचा विस्तार करणे, अंतर्गत रिंग रोडचे अडथळे दूर करणे आणि ‘मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब’ विकसित करून वाहतूक कोंडी मुक्त शहर करणे.

💮शाश्वत पर्यावरण: पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांना (Riverfront Development) गती देऊन शहराचे पर्यावरण रक्षण करणे.

💮आधुनिक सुविधा: वाढत्या शहरीकरणासाठी आवश्यक जागतिक दर्जाची उद्याने आणि अत्याधुनिक क्रीडांगणांचे नियोजन करणे.

💮शिक्षण व आरोग्य: लोकसंख्यावाढीचा वेग लक्षात घेऊन नवीन शाळा आणि अद्ययावत रुग्णालयांसाठी जमिनींची आरक्षणे सुनिश्चित करणे.

💮स्मार्ट शाश्वतता: २०४१ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून तंत्रज्ञानावर आधारित ‘स्मार्ट’ नागरी सुविधांची निर्मिती करणे.

का महत्त्वाची आहे ही समिती?

💮 शहराचे नागरीकरण प्रचंड वेगाने होत असताना ही समिती शहराचा ‘कायापालट’ करण्यासाठी महत्त्वाची ठरेल:

💮टी.पी. स्कीम (Town Planning Schemes): गुंठेवारी आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी शास्त्रीय नियोजनाची गरज आहे.

💮औद्योगिक पट्टा: एमआयडीसी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे नियोजन करून उद्योगांना बळ देणे.

💮समन्वय: पुणे महापालिका आणि पीएमआरडीए यांच्याशी समन्वय ठेवून रस्ते जोडणी आणि प्रादेशिक विकास साधणे.

💮राहण्यायोग्यता (Livability): केवळ रस्ते आणि ड्रेनेज नाही, तर शहराचा ‘लिव्हेबिलिटी इंडेक्स’ सुधारून स्टार्टअप्स, आयटी हब (हिंजवडी) आणि लॉजिस्टिक हबसाठी पूरक वातावरण निर्माण करणे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleफायरिंग करून पोलिसांच्या तावडीतून निसटलेला आरोपी अखेर अटकेत
Next Article सामाजिक कार्याचा गौरव : पैलवान काळुराम लांडगे यांना ‘राष्ट्रीय संत प्रेरणा गौरव पुरस्कार २०२६’
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?