Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी ७० हजारांची लाच; महापालिकेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
पिंपरी चिंचवड

बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी ७० हजारांची लाच; महापालिकेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड, दि.१२ जून : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विरोधी विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) पुणे पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महापालिकेतील अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात खळबळ उडाली आहे.

एसीबीच्या माहितीनुसार, उमेश अरुण लोंढे (वय २८) हे ड प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (वर्ग-३) म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराची पिंपळे गुरव परिसरात एक गुंठा जागा असून त्याठिकाणी त्यांनी तीन मजली इमारत बांधली होती. संबंधित बांधकामासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेतलेली नसल्याने ते अनधिकृत असल्याचे नमूद करत महापालिकेने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नोटीस बजावली होती.

या नोटिशीविरोधात तक्रारदाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने नियमानुसार दंड भरून बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याचे निर्देश दिल्यानंतर तक्रारदाराने नियमितीकरणासाठी अर्ज सादर केला होता.

दरम्यान, ८ जून रोजी उमेश लोंढे यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून त्यांच्या इमारतीविषयी तक्रारी असल्याचे सांगितले. तसेच बांधकाम अनधिकृत असल्याने ते पाडण्यात येऊ शकते, अशी भीती दाखवत अतिक्रमण विभागाकडून कारवाई टाळण्यासाठी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ९ जून रोजी अँटी करप्शन ब्युरो, पुणे येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ११ जून रोजी पंचांसमक्ष पडताळणीदरम्यान आरोपीने ७० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सापळा राबविण्यात आला. यावेळी उमेश लोंढे यांनी तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने सायंकाळी ५.३५ वाजता त्यांना रंगेहात अटक केली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश वाळके आणि पोलीस निरीक्षक प्रवीण निबाळकर यांच्या पथकाने केली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी येथे कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा
Next Article दुबई-थायलंडमधून सायबर रॅकेट चालवणारा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार जेरबंद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?