Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी येथे कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा
पिंपरी चिंचवड

मोशी येथे कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 11, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड, दि. १२ जून २०२६ : मोशी परिसरातील इंडियन ऑईल काजळे पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांडुरंग एकनाथ कुचेकर (वय ३५, रा. खंडेवस्ती, भोसरी) हे त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच १४ एफबी ९११२) वरून बहिण सविता दयानंद कांबळे (वय ३०) यांना मोशी येथील इंडियन ऑईल काजळे पेट्रोल पंपाजवळून आदर्शनगर येथील घरी घेऊन जात होते. त्यावेळी कंटेनर क्रमांक NL 01 AD 2845 वरील चालक सुंदर पंढरीनाथ गवळी (वय २६, रा. दिधी, पुणे, मूळ रा. धारूर, जि. बीड) याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन तो निकामी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच मागे बसलेल्या सविता कांबळे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकास अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पानसरे करीत आहेत.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात तरुणाला मारहाण करून मोबाईल व रोकड लुटल्याप्रकरणी गुन्हा
Next Article बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी ७० हजारांची लाच; महापालिकेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?