Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापालिकेतील शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर; सहप्रकल्प अधिकाऱ्याची उचलबांगडी
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर; सहप्रकल्प अधिकाऱ्याची उचलबांगडी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आरटीई प्रवेश प्रक्रियेतील वादानंतर सहप्रकल्प अधिकारी विलास पाटील यांची उचलबांगडी; शिक्षण विभागात खळबळ

पिंपरी : आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या कागदपत्र पडताळणी केंद्राशी संबंधित वादानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने सहप्रकल्प अधिकारी विलास पाटील यांचा पदभार तात्काळ रद्द करत त्यांची बदली केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या कागदपत्र पडताळणी केंद्रावर सचिव म्हणून कार्यरत असताना काही अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले होते. या प्रकरणात एका बाह्य व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची घटना घडल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यासंदर्भातील वृत्ते विविध माध्यमांमधूनही प्रसिद्ध झाली होती.

याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने विलास पाटील यांच्या कामकाजाबाबत गंभीर दखल घेत त्यांचा सहप्रकल्प अधिकारी पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. त्यांची बदली शेवंताबाई खंडूजी जगताप वैदूवस्ती मुला-मुलींची शाळा क्रमांक ५८ येथे करण्यात आली असून तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित मुख्याध्यापकांना त्यांचा रुजू अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, पाटील यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही विविध तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा मुद्दाही प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याची चर्चा आहे. तथापि, संबंधित आरोपांची अधिकृत चौकशी अद्याप सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण विभागातील या कारवाईमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित अधिकाऱ्याविरोधातील तक्रारींवर दीर्घकाळ कारवाई का झाली नाही, याबाबतही चर्चा सुरू आहे. पत्रकारांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनावर दबाव वाढल्याचे बोलले जात आहे.

सध्या या संपूर्ण प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले असून भविष्यात संबंधित अधिकाऱ्याविरोधात खातेनिहाय चौकशी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौकशीत गंभीर दोष आढळल्यास नियमानुसार पुढील शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. मात्र, चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे उचित ठरणार नसल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआकुर्डीतील ११ एकर औद्योगिक प्रकल्पासाठी महावितरणमध्ये २० ते २५ कोटींचा गैरव्यवहार?; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी
Next Article समर्थच्या विद्यार्थ्यांची MHT-CET (PCB) परीक्षेत सुवर्णझेप
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?