पुणे चाकण, : चाकण परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ जून २०२६ रोजी रात्री ११.०३ वाजण्याच्या सुमारास मौजे वाकण गाव हद्दीतील महात्मा फुले चौक ते आंबेठाण चौक दरम्यान समाधान खानावळीजवळ असलेल्या नवनाथ गोरे यांच्या इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला, सम्राट पान मसाला, राजनिवास सुगंधित पान मसाला तसेच तंबाखू असा एकूण ३९ हजार ७०२ रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला. हा माल विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक बेरोवा मनोहर यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ ज्ञानोबा गोरे (वय ५१, व्यवसाय पानटपरी चालक, रा. आंबेठाण रोड, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०२/२०२६ अन्वये BNS कलम १२३, २७४, २७५, २२३ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रतिबंधित गुटखा राम गुप्ता नामक व्यक्तीकडून पुरविण्यात आल्याची माहितीही प्राथमिक तपासात समोर आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. :::
