पिंपरी : पिंपरी पोलीस ठाण्यात मारहाण व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ जून २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ, बौद्धनगर, पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी शाहिद तैमुर गेखा (वय २७, रा. पाण्याच्या टाकीजवळ, बौद्धनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जल्ला उर्फ मेहताब शेख (वय १८, पूर्ण पत्ता उपलब्ध नाही, रा. बौद्धनगर, पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटकेत नाही.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या घराशेजारी राहणारा असून त्याने फिर्यादी शाहिद गेखा व त्यांचा भाऊ साहिल यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यावर व खांद्यावर दगडाने वार करून त्यांना जखमी केले. यानंतर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३९/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५२ व ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.