तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी परिसरात कौटुंबिक वादातून एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेखा सोमा भांडे (वय ३७, रा. फ्लॅट क्र. ३०७, मंत्रा सिटी, ए विंग, बाळदे मळा, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना ८ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडली.
तक्रारीनुसार, फिर्यादी यांनी आधार कार्ड काढण्यासाठी आरोपीचे आधार कार्ड आवश्यक असल्याचे सांगितल्याने आरोपी सागर पंढरीनाथ राजगुरू (रा. फ्लॅट क्र. ३०७, मंत्रा सिटी, ए विंग, बाळदे मळा, तळेगाव दाभाडे) याने वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत अपमानास्पद वक्तव्य केले. त्यानंतर रागाच्या भरात फिर्यादीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या ट्रायसायकलने त्यांच्या डाव्या मांडीवर, डाव्या हाताच्या अंगठ्यावर तसेच पायाच्या बोटांवर मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादी जखमी झाल्या असून त्यांच्या अंगावर सूज व वळ आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करीत आहेत.