Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»गुन्हेगारी साम्राज्यावर पोलिसांचा प्रहार; पाच टोळ्यांचे कंबरडे मोडले
पिंपरी चिंचवड

गुन्हेगारी साम्राज्यावर पोलिसांचा प्रहार; पाच टोळ्यांचे कंबरडे मोडले

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलत पाच कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांमधील तब्बल ४५ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि दहशत निर्माण करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना या कारवाईचा फटका बसला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सन २०२६ मध्ये आतापर्यंत २७ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील १५० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई केली असून, मे महिन्यातील ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आफताब समीर शेख टोळीवर १२ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून या टोळीतील सात आरोपींवर मोका लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे साबीर समीर शेख टोळीविरुद्ध १९ गंभीर गुन्हे दाखल असून या टोळीतील तब्बल २१ आरोपींवर मोका कारवाई करण्यात आली आहे.

काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विकी शंभुलिंग सुतार टोळीवर आठ गंभीर गुन्हे दाखल असून चार आरोपींना मोका कायद्याखाली आणण्यात आले आहे. उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सागर बाळू जावळे टोळीवर सात गंभीर गुन्ह्यांची नोंद असून सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबादास उर्फ सोन्या राठोड टोळीतील सहा आरोपींवर मोका लागू करण्यात आला आहे. या टोळीतील काही आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या सर्व टोळ्यांनी पिंपरी-चिंचवड, पुणे आणि अहिल्यानगर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला होता. अवैध मार्गाने आर्थिक लाभ मिळवणे, खंडणी उकळणे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित कागदपत्रांची छाननी केल्यानंतर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड यांनी १२ गुन्ह्यांमध्ये, तर अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) श्री. बसवराज तेली यांनी १५ गुन्ह्यांमध्ये मोका कायद्याचा समावेश करण्याचे आदेश दिले.

पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर तसेच विविध परिमंडळांचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. देहूरोड, काळेवाडी, उत्तर म्हाळुंगे व चिखली पोलीस ठाण्यांचे अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि मालमत्ता विरोधी पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleउपवर्गीकरणाविरोधात ५८ जातींचा एल्गार; वैजापूरमधून राज्यव्यापी आंदोलनाची हाक
Next Article कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?