Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»उपवर्गीकरणाविरोधात ५८ जातींचा एल्गार; वैजापूरमधून राज्यव्यापी आंदोलनाची हाक
महाराष्ट्र

उपवर्गीकरणाविरोधात ५८ जातींचा एल्गार; वैजापूरमधून राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वैजापूर (प्रतिनिधी) विजयकुमार मोकळे : महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी अनंत बदर समिती स्थापन केल्यानंतर राज्यभरात विविध सामाजिक संघटनांकडून विरोधाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील जेतवन बुद्ध विहारात शनिवारी (दि. ६ जून) अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत उपवर्गीकरणाविरोधात ५८ जातींनी एकजूट दर्शवत व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

परिषदेची सुरुवात तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्याते प्रा. आबासाहेब कसबे यांनी केले, तर शिक्षक संघटनेचे जिल्हा नेतृत्व विलास त्रिभुवन आणि बहुजन समाज पक्षाचे नेते बाबासाहेब पगारे यांनी प्रस्तावना मांडली.

या परिषदेत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दिनकर दादा ओंकार, प्रा. डॉ. एच. एन. सोनकांबळे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. दिलीप महालिंगे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. सोनकांबळे यांनी अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची पार्श्वभूमी, त्याचे संभाव्य परिणाम आणि समाजाची भूमिका यावर सविस्तर विवेचन केले. तर दिनकर दादा ओंकार आणि प्रा. महालिंगे यांनी उपवर्गीकरणाच्या विरोधातील लढ्याची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि पुढील आंदोलनाची रणनीती यावर भाष्य केले.

कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध कवी, गायक व व्याख्याते विजय मोकळे करंजगावकर यांनी ‘छोटा भाऊ–मोठा भाऊ’ ही उपवर्गीकरण विषयावरील रचना सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

परिषदेत उपवर्गीकरणासंदर्भातील वास्तव परिस्थिती, आगामी आंदोलनांची दिशा, संघटनात्मक बळकटीकरण तसेच राज्यव्यापी चळवळीची उभारणी या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी पुढील आंदोलनासाठी विविध ठरावही मंजूर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल होते. त्यांनी अध्यक्षीय समारोपात सर्व उपस्थितांचे आभार मानून समाजाने एकसंघ राहून हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.

या परिषदेला पत्रकार व मार्केट कमिटी संचालक प्रशांत त्रिभुवन, कलाकार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पठारे, काशिनाथ बागुल, पंचशीला धनेश्वर, नामदेव त्रिभुवन, मनीष गणवीर, प्रल्हाद सातुरे, वाल्मीक त्रिभुवन, जानवी मोकळे, राजनंदिनी मोकळे, शिक्षण अधिकारी मनीष दिवेकर, साहेबराव पडवळ यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक-उपासिका आणि समाजबांधव उपस्थित होते.

Post Views: 21
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या अंमलबजावणीसाठी महापालिकेची विशेष कार्यशाळा
Next Article गुन्हेगारी साम्राज्यावर पोलिसांचा प्रहार; पाच टोळ्यांचे कंबरडे मोडले
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?