Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»सेवा कर भरण्यात झोपडपट्टीवासीयांचा सक्रीय पुढाकार
पिंपरी चिंचवड

सेवा कर भरण्यात झोपडपट्टीवासीयांचा सक्रीय पुढाकार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दोन महिन्यात सुमारे ५० टक्के झोपडपट्टीवासीयांनी डिजिटल करप्रणालीद्वारे भरला सेवाकर

पिंपरी, दि.०३ मे २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत झोपडपट्टीधारकांकडून आकारण्यात येणाऱ्या सेवा कराच्या वसुलीस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या कालावधीत झोपडपट्टीधारकांनी सेवा करापोटी एकूण १३ लाख ८१ हजार ८६९ रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने ७ लाख ४६ हजार ४३५ रुपये तर ऑनलाइन पद्धतीने ६ लाख ३५ हजार ४३४ रुपयांचा कर जमा झाला आहे. झोपडपट्टीवासीय कर भरण्यामध्ये मागे नसून शहराच्या विकास प्रक्रियेत तेही सक्रिय सहभाग नोंदवत असल्याचे यावर्षीच्या कर संकलनातून स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, डिजिटल व्यवहारांना नागरिकांकडून वाढती पसंती मिळत असून सेवा कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. चालू वर्षातील एकूण कर संकलनामध्ये ऑनलाइन भरण्याचे प्रमाण सुमारे ५० टक्के आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत ऑनलाइन कर भरण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून नागरिक अधिकाधिक डिजिटल माध्यमांचा स्वीकार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचत असून कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर झाली आहे.

झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत नागरिकांना सेवा कर भरण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच झोपडपट्टी सेवा कराची बिले झोपडपट्टी परिसरातील महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच वितरित करण्यात येत आहेत. महिला बचत गटांकडून सेवा कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात असून कर भरण्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. या उपक्रमांमुळे झोपडपट्टीधारक नागरिकांचा सेवा कर भरण्यातील सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे.

“पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टीधारक नागरिक सेवा कर भरण्यामध्ये मागे नसून शहराच्या विकास प्रक्रियेत जबाबदारीने सहभाग घेत आहेत, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या सेवाकर वसुलीस नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्या नागरी कर्तव्यांविषयीच्या जागरूकतेचे प्रतीक आहे. विशेषतः ऑनलाइन कर भरण्याकडे वाढत असलेला कल हा डिजिटल प्रशासनाला मिळणारा नागरिकांचा विश्वास दर्शवितो”

— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

“झोपडपट्टीधारक नागरिकांकडून सेवा कर भरण्यास मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा नागरिकांच्या वाढत्या नागरी जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. शहराच्या विकासासाठी महसूल संकलन अत्यंत महत्त्वाचे असून झोपडपट्टीवासीयही त्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन हेच दर्शवित आहेत. झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत नागरिकांना कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. सेवा करातून प्राप्त होणारा महसूल विविध नागरी सुविधा आणि विकासकामांसाठी महत्त्वाचा असून सर्व झोपडपट्टीधारक नागरिकांनी नियमितपणे कर भरून शहर विकासातील आपला सहभाग अधिक दृढ करावा”.

– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“झोपडपट्टीधारक नागरिकांकडून सेवा कर भरण्यास मिळत असलेला प्रतिसाद हा अत्यंत समाधानकारक असून नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे यातून दिसून येते. विशेषतः ऑनलाइन कर भरण्याला मिळणारी वाढती पसंती ही डिजिटल सेवांबाबत नागरिकांचा वाढता विश्वास दर्शविते. झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत झोपडपट्टीतील महिला बचत गटांच्या (सोनचिरैया सारथी शहर उपजिविका केंद्र) सहकार्याने सेवा कराची बिले वितरित करण्यात येत आहेत. तसेच विभागामार्फत जनजागृती करणे, ऑनलाइन व ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून सेवाकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे यामुळे झोपडपट्टीवासीयांचा सेवाकर भरण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे”
— अण्णा बोदडे, उप आयुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग
Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Next Article बेलसर टोल प्लाझामुळे पीएमपीएमएल प्रवाशांवर १ रुपया अतिरिक्त आकारणीचा बोजा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?