Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»सोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी चिंचवड

सोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
जनगणना प्रक्रिया पूर्णतः डिजिटल आणि पारदर्शक; नागरिकांना अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन

पिंपरी, दि. २ जून २०२६ : पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या ‘जनगणना २०२७’च्या घरसूचीकरण व घरगणना सर्वेक्षणासंदर्भात सोशल मीडियावर दिशाभूल करणारे संदेश, अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्याने नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीने राबविली जात असून, कोणत्याही खोट्या माहितीस बळी पडू नये, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर जनगणना प्रक्रियेबाबत विविध प्रकारची अप्रमाणित माहिती आणि खोटी संकेतस्थळे प्रसारित होत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचे उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

महापालिकेने नियुक्त केलेल्या अधिकृत प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्या माध्यमातूनच जनगणनेचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत कोणत्याही कागदी फॉर्मचा वापर न करता मोबाईलवरील अधिकृत ‘एचएलओ ॲप ’द्वारे ऑनलाइन स्वरूपात माहिती नोंदविली जात असल्याचे शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

महापालिकेच्या माहितीनुसार, ‘जनगणना २०२७’च्या पहिल्या टप्प्यातील घरसूचीकरण व घरगणनेच्या प्रत्यक्ष कामास १६ मे २०२६ पासून सुरुवात झाली असून, ही प्रक्रिया १४ जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. एचएलओ ॲपच्या माध्यमातून घरांचे सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात येत असून, ही प्रक्रिया सुरक्षित, अचूक आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात राबविली जात असल्याचेही शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी नमूद केले.

प्रशासनाने नागरिकांना खोट्या संकेतस्थळांपासून आणि सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अचूक जनगणना ही शहर विकासाची भक्कम पायाभरणी असून, शाळा, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर नागरी सेवांचे नियोजन अचूक माहितीच्या आधारेच प्रभावीपणे करता येते, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

जनगणना अधिकारी केवळ आवश्यक माहिती नोंदवतात. ते कोणतेही आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा इतर सरकारी कागदपत्र, बँक तपशील अथवा मोबाईल ओटीपी मागत नाहीत. नागरिकांनी दिलेली सर्व माहिती सुरक्षित आणि गोपनीय राखली जाते. त्यामुळे जनगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करून शहर विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

“सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहिती, अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी केवळ अधिकृत जनगणना कर्मचाऱ्यांनाच सहकार्य करावे. संपूर्ण जनगणना प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात ‘एचएलओ ॲप ’च्या माध्यमातून राबविली जात असून नागरिकांनी विश्वासाने आणि जबाबदारीने आपला सहभाग नोंदवावा.”

— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“जनगणना २०२७ अंतर्गत माहिती संकलनाचे काम ‘एचएलओ ॲप ’च्या माध्यमातून अधिकृत प्रगणक आणि पर्यवेक्षकांमार्फत पूर्णतः ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा किंवा अपप्रचारावर विश्वास न ठेवता अधिकृत जनगणना कर्मचाऱ्यांनाच सहकार्य करावे. जनगणना अधिकारी कोणतेही कागदपत्र, बँक तपशील किंवा मोबाईल ओटीपी मागत नाहीत”

— सचिन पवार, उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleथेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
Next Article सेवा कर भरण्यात झोपडपट्टीवासीयांचा सक्रीय पुढाकार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?