“पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा जपत राहा,”
पिंपरी, दि. २ जून : ज्येष्ठ पत्रकार दादाराव आढाव आणि युवा पत्रकार देवा भालके यांचा वाढदिवस पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पत्रकार कक्षात साजरा करण्यात आला. यावेळी दोघांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये सुनिल बाबू कांबळे, अशोक कोकणे, मंदाताई बनसोडे, शेहनाझ शेख, माऊली भोसले, नागेश पागे, बापू गोरे, अविनाश कांबिकर, गणेश मोरे, गणेश शिंदे, गायकवाड यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी दादाराव आढाव यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घ अनुभव, समाजाभिमुख कार्य आणि मार्गदर्शक भूमिका यांचा गौरव केला. तसेच युवा पत्रकार देवा भालके यांच्या कार्यतत्परता, सामाजिक प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमात विविध पत्रकारांनी मनोगत व्यक्त करत दोन्ही पत्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे पत्रकार बांधवांमधील एकोपा आणि आपुलकीचे दर्शन घडले.
“पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा जपत राहा,” अशा शुभेच्छांसह उपस्थितांनी दादाराव आढाव आणि देवा भालके यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
