Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»स्वच्छ पिंपरी-चिंचवडसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड

स्वच्छ पिंपरी-चिंचवडसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा – महापौर रवि लांडगे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपळे गुरव येथे भव्य स्वच्छता अभियान; २ हजार किलोहून अधिक कचरा संकलित

पिंपरी, दि. ३१.०५.२०२६ : स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन राबविलेले स्वच्छता उपक्रम शहरासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपळे गुरव येथील पीडब्ल्यूडी मैदान ते डायनासोर गार्डन परिसरात वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड असोसिएशन (WMSCOGA) यांच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियान व पर्यावरण जनजागृती मोहिमेत महापौर रवि लांडगे यांनी सहभाग घेत स्वयंसेवकांचे कौतुक केले.

या उपक्रमात स्वयंसेवक, स्थानिक नागरिक तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागांमधील कचरा संकलित केला. मोहिमेदरम्यान सुमारे २ हजार किलोहून अधिक कचरा हटविण्यात आल्याने परिसर अधिक स्वच्छ व सुंदर झाला

 “स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या संयुक्त सहभागातूनच स्वच्छ व हरित पिंपरी-चिंचवडची संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”

……..महापौर रवि लांडगे. पिंपरी चिंचवड 

स्वच्छता मोहिमेबरोबरच पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि हवामान बदल याविषयी जनजागृती करण्यात आली. स्वयंसेवकांनी नागरिकांशी संवाद साधून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला.

महापौरांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन करत भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना महानगरपालिकेचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही दिली.

या यशस्वी उपक्रमामुळे नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून शहर स्वच्छता चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून स्वच्छ व हरित पिंपरी-चिंचवडच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
Next Article वेळेवर दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाहतूक कर्मचाऱ्याचे प्राण वाचले
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?