पिंपरी चिंचवड : दारू पिण्यास विरोध केल्याच्या रागातून एका महिलेला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना किवळे येथे घडली. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. २८ मे २०२६ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कातळेवस्ती, जयगणेश मंगल कार्यालयासमोर, किवळे रोड, ता. हवेली, जि. पुणे येथे घडला.
याप्रकरणी अजय ज्ञानोबा चिंचवडे (वय ४९, व्यवसाय शेती, रा. सर्व्हे नं. ५४/४, चिंचवडे पाटील वस्ती, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.तर अनिल सुमंत माने (वय ५०, रा. कातळेवस्ती, जयगणेश मंगल कार्यालयासमोर, किवळे रोड, किवळे, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरोधात बीएनएस कलम ११८(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी यांच्या भाची पद्मिनी माने हिने आरोपीला “दारू पिऊ नका” असे सांगितल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यातून आरोपीने महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.