किवळे.…..पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने किवळे परिसरातील एका लॉजवर छापा टाकत अनैतिक व्यवसाय प्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३ (२) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ मे २०२६ रोजी रात्री ८.५५ वाजण्याच्या सुमारास किवळे येथील सिटी वन स्क्वेअर, कस्तुरी कॉर्नर, साईपार्क टाउन परिसरातील “स्काय इन लॉज” येथे ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर दि. २८ मे २०२६ रोजी पहाटे ५.५० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी फिर्यादी म्हणून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड येथील सपोफी सुनिल जगन्नाथ शिरसाट (वय ४६) यांनी तक्रार दिली आहे.पोलीसांनी प्रेम विधाम जैसवाल (वय ५०) याला अटक केली असून तो सध्या वेदांत पार्क, मुकाई चौक, किवळे येथे राहत होता. त्याचा मूळ पत्ता ग्राम बढाईया, ठाणा हनुमता, जिल्हा शिव, मध्य प्रदेश असा आहे.
तपासात आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे समोर आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ८ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हा या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
