Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»फुगेवाडी विषारी दारू प्रकरण; वायसीएम रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रकृतीची महापालिका आयुक्तांकडून विचारपूस
पिंपरी चिंचवड

फुगेवाडी विषारी दारू प्रकरण; वायसीएम रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रकृतीची महापालिका आयुक्तांकडून विचारपूस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रुग्णांच्या नातेवाईकांशीही साधला संवाद; महापालिका रुग्णालयात दाखल रुग्णांवर मोफत उपचार केले जाणर

पिंपरी, दि. २९ मे २०२६: फुगेवाडी येथील विषारी दारू सेवन केलेल्या रुग्णांना महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. दाखल रुग्णांवर आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना दिलासा देखील आयुक्तांनी दिला.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, तसेच वायसीएम रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयातील उपचार व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. परिस्थिती लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने सतर्क राहून या प्रकरणातील आलेल्या रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर तात्काळ आवश्यक सर्व उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दाखल रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या रुग्णांच्या प्रकृती विषयी माहिती दिली. महापालिकेच्या वतीने उत्तम वैद्यकीय उपचार रुग्णांवर केले जात आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत सातत्याने या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात असून या रुग्णांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार येण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सातत्याने कार्यान्वित ठेवण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी नातेवाईकांना दिली. काळजी करू नका, महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असा धीर देखील रुग्णांच्या नातवाईकांना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.

“विषारी दारू प्रकरणातील दाखल सर्व रुग्णांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी वायसीएम रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याच्या तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

             – डॉ. विजय सूर्यवंशी,आयुक्त, पिंपरी                                                चिंचवड महानगरपालिका.

“वायसीएम रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तज्ञ डॉक्टर आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. या प्रकरणातील दाखल रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सध्या तीन रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीवर रुग्णालय प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. बाधित रुग्णांनी वेळेत वैद्यकीय उपचार करून घेणे अत्यंत आवश्यक असून या बाधितांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.”

    – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशिर्डीत लोककलावंतांचा राष्ट्रीय महामेळावा; अनेक दिग्गज कलावंतांचा होणार सन्मान
Next Article फुगेवाडीतील विषारी हातभट्टी प्रकरणी ६ आरोपी अटकेत;१० जणांचा मृत्यू
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?