Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»६० कोटींच्या उपसूचना घोटाळ्यानंतर मनपात मोठी खळबळ
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या उपसूचना घोटाळ्यानंतर मनपात मोठी खळबळ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुख्य लेखा अधिकारी प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे आर्थिक कारभाराची धुरा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी…..पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित ६० कोटी रुपयांच्या उपसूचना घोटाळा प्रकरणात राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी सत्यवान किशनराव उबाळे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने २९ मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले.

महापालिकेच्या आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अंदाजपत्रकात कोणतीही ठोस आर्थिक तरतूद नसताना आणि प्रशासकीय मंजुरीचे स्पष्ट निकष पूर्ण न करताच तब्बल ६० कोटी रुपयांच्या उपसूचना मंजुरीसाठी पुढे आणण्यात आल्याचा प्रकार त्यांनी उघडकीस आणला.

सभापती बारणे यांच्या निदर्शनास आलेल्या या फाईल्समध्ये आर्थिक व तांत्रिक अनियमितता असल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर त्यांनी सखोल चौकशी सुरू केली. तपासादरम्यान, नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून प्रवीण जैन यांनी या प्रक्रियेला आक्षेप घेण्याऐवजी संबंधित फाईल्स पुढे सरकवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात कंत्राटदारांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी संगनमताने हालचाली झाल्याचा आरोप करण्यात आला असून, सभापती अभिषेक बारणे यांनी पुराव्यांसह राज्य शासन आणि वित्त मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मंत्रालय स्तरावर प्राथमिक चौकशी करण्यात आली. आर्थिक शिस्त भंग झाल्याचे आणि पालिकेच्या निधीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने कठोर भूमिका घेत जैन यांची बदली करण्याचा निर्णय घेतला.

शासन आदेशानुसार, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील सहसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, नवी मुंबई महानगरपालिकेतील मुख्य लेखा अधिकारी सत्यवान किशनराव उबाळे यांच्याकडे आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक कारभाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, शासनाने आपल्या आदेशात बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नवीन पदावर रुजू व्हावे, तसेच प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना विलंब न करता कार्यमुक्त करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी उघडकीस आणलेल्या या प्रकरणामुळे महापालिकेतील आर्थिक व्यवहार, उपसूचना मंजुरी प्रक्रिया आणि कंत्राटदारांशी संबंधित व्यवहार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleउच्चस्तरीय चौकशीसह मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत द्या : आमदार अमित गोरखे
Next Article बारावीच्या १० विद्यार्थ्यांचा निकालच गायब; बी.एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूल प्रशासनावर पालकांचा संताप
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?